ऊसतोड मजुरांना ब्लँकेट वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:36 IST2020-12-30T04:36:10+5:302020-12-30T04:36:10+5:30
आष्टा : येथील फायटर्स कला, क्रीडा, व्यायाम व सांस्कृतिक युवक मंडळ यांच्यावतीने ऊस तोडणी कामगारांना ब्लँकेट व खाऊ वाटप ...

ऊसतोड मजुरांना ब्लँकेट वाटप
आष्टा : येथील फायटर्स कला, क्रीडा, व्यायाम व सांस्कृतिक युवक मंडळ यांच्यावतीने ऊस तोडणी कामगारांना ब्लँकेट व खाऊ वाटप करण्यात आला.
यावेळी विक्रम भाेपे म्हणाले. ऊसतोड मजूर घरदार सोडून भविष्य सुखकर व्हावे म्हणून अहोरात्र मेहनत करतात. त्यांच्या अपार मेहनतीला समाजाने सहकार्य करणे गरजेचे आहे.
यावेळी शिवाजीराव शिंदे, सुभाष तगारे, महादेव झांबरे, भीमराव पाटील, संग्राम शिंदे, अशोक मदने, वसंत कांबळे, प्रसाद देसाई व शहाजान जमादार उपस्थित होते.
फोटो : २९१२२०२०-आयएसएलएम-आष्टा ब्लॅँकेट न्यूज
ओळ :
आष्टा येथे ऊसतोड मजुरांना ब्लँकेट व खाऊ वाटप करताना शिवाजीराव शिंदे, विक्रम भाेपे, सुभाष तगारे, अशोक मदने, संग्राम शिंदे ,वसंत कांबळे, प्रसाद देसाई, शहाजहान जमादार, महादेव झांबरे.