करमाळे येथे वाढदिनी रोपांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:37 IST2021-06-16T04:37:05+5:302021-06-16T04:37:05+5:30

फोटो : विष्णू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकऱ्यांना आब्यांच्या रोपांचे वाटप करण्यात आले. लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : करमाळे (ता.शिराळा) ...

Distribution of birthday saplings at Karmale | करमाळे येथे वाढदिनी रोपांचे वाटप

करमाळे येथे वाढदिनी रोपांचे वाटप

फोटो : विष्णू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकऱ्यांना आब्यांच्या रोपांचे वाटप करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : करमाळे (ता.शिराळा) येथील ज्येष्ठ नागरिक विष्णू शामराव पाटील यांचा वाढदिवस आंब्यांच्या रोपांचे वाटप करून साधेपणाने साजरा करण्यात आला. येथील शेतकऱ्यांना प्रत्येकी एक याप्रमाणे शंभर रोपांचे वाटप करण्यात आले. यानिमित्ताने हरित गाव उपक्रमास लोकांचा प्रतिसाद वाढत आहे. यासाठी समाजातील अनेक घटक हातभार लावत आहेत.

गावातील तरुणांनी पुढाकार घेऊन हरितग्राम हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत गावातील प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात येत आहे. शिवाय शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर लावण्यासाठी फळझाडांचे मोफत वाटप करण्यात येत आहे. यासाठी समाजातील अनेक घटक मोलाचे सहकार्य केले आहे. कुणी स्वइच्छेने, तर कुणी वाढदिवसाच्या निमित्ताने ही रोपे उपलब्ध करून देत आहेत.

या चळवळीला हातभार म्हणून क्रांतिसिंह पाटील यांनी आपल्या वडिलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शंभर आंब्याच्या रोपांचे वाटप केले. यावेळी तुकाराम पाटील, बबन पाटील, एस. आर. पाटील, विलास माने, संभाजी यादव, अरविंद पाटील, मारुती पाटील, डॉ. दिलीप पाटील, राजेंद्र कांबळे, महेश पाटील, सुनील पाटील, सुशील पाटील उपस्थित होते.

Web Title: Distribution of birthday saplings at Karmale