चिखलीत आनंदराव नाईक गुणवत्ता पुरस्कारांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:31 IST2021-09-04T04:31:58+5:302021-09-04T04:31:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : चिखली (ता. शिराळा) येथे स्वातंत्र्यसेनानी, देशभक्त आनंदराव नाईक यांच्या ११९ व्या जयंतीनिमित्ताने गुणवत्ता पुरस्काराचे ...

चिखलीत आनंदराव नाईक गुणवत्ता पुरस्कारांचे वितरण
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : चिखली (ता. शिराळा) येथे स्वातंत्र्यसेनानी, देशभक्त आनंदराव नाईक यांच्या ११९ व्या जयंतीनिमित्ताने गुणवत्ता पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
अध्यक्षस्थानी विश्वास व विराज उद्योग समूहाचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक होते. ‘विश्वास’चे उपाध्यक्ष माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरुडकर, विश्वास शिक्षण समुहाचे अध्यक्ष अमरसिंग नाईक, प्रचिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रसिंह नाईक प्रमुख उपस्थित होते.
यावेळी साहित्यिक, ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय चोरमारे म्हणाले की, बहुजन समाजाच्या लोकांच्या कामांची नोंद नसल्याने त्यांचे चांगले कार्य इतिहासाबरोबर वाहून जाते. त्यामुळे स्वातंत्र्यसेनानी आनंदराव नाईक यांच्या कार्याची नोंद करावी. त्यामुळे त्यांच्या कार्याची माहिती भावी पिढीला होईल.
आमदार नाईक म्हणाले, आम्ही समाजातील सर्व स्तरातील गुणवत्तापूर्ण काम करणाऱ्या घटकांचे दरवर्षी कौतुक करीत असतो.
ग्रामीण कथाकार बाबासाहेब परीट यांनी प्रास्ताविक केले. केंद्रीय पोलीस उपाधीक्षक तुषार गावडे, पीएच. डी. मिळाल्याबद्दल सुनील गायकवाड, प्रवीण पाटील, सागर माहिते व दत्तात्रय पाटील यांचा, तर तालुक्यात दहावी व बारावी परीक्षेत अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार झाला.
दिनकरराव पाटील, सुरेश पाटील, विश्वास कदम, बाळासाहेब पाटील, बिरुदेव आमरे, दत्तात्रय पाटील, कार्यकारी संचालक राम पाटील आदी उपस्थित होते.