शिगावात आधार कार्डचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:25 IST2021-03-26T04:25:40+5:302021-03-26T04:25:40+5:30

शिवसेना शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. भूषण भासर म्हणाले, महापुरामुळे अनेक नागरिकांची कागदपत्रे गहाळ झाली होती. शासकीय कामासाठी खूप अडचणी ...

Distribution of Aadhar card in Shigawa | शिगावात आधार कार्डचे वाटप

शिगावात आधार कार्डचे वाटप

शिवसेना शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. भूषण भासर म्हणाले, महापुरामुळे अनेक नागरिकांची कागदपत्रे गहाळ झाली होती. शासकीय कामासाठी खूप अडचणी येत होत्या. म्हणून आम्ही सांगली जिल्हा शिक्षक सेनेच्यावतीने आधार कार्डसाठी मेळावा आयोजित केला होता. लवकरच पुन्हा एकदा आधार कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड संदर्भात नागरिकांचा मेळावा घेणार आहे. कोरोनाच्या महामारीमुळे शासनाचे निर्बंध पाळून आम्ही सर्व आधार कार्ड प्रत्येक नागरिकांच्या घरी जाऊन वाटप केले. शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांचे मार्गदर्शन लाभले.

यावेळी सरपंच उत्तम गावडे, बी. टी. पाटील, प्रथमेश काटे, तेजस पवार, गणेश थोरात, अभिजीत पाटील, सुभाष पाटील, पंकज गोसावी, सौरभ जाधव उपस्थित होते.

फोटो २५शिगाव : शिगाव : शिगाव (ता.वाळवा) येथे आधार कार्डच्या वाटपप्रसंगी सुभाष पाटील, शिवसेना शिक्षक सेना जिल्हा अध्यक्ष प्रा. भूषण भासर, पंकज गोसावी आदी उपस्थित होते.

Web Title: Distribution of Aadhar card in Shigawa