विस्टियॉन व आयुषतर्फे २५ फोल्डिंग बेडचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:20 IST2021-05-28T04:20:20+5:302021-05-28T04:20:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कुपवाड येथील आयुष सेवाभावी संस्थेच्यावतीने शहरातील नमराह, डॉ. पतंगराव कदम व पोलीस कोविड सेंटरमध्ये ...

विस्टियॉन व आयुषतर्फे २५ फोल्डिंग बेडचे वाटप
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कुपवाड येथील आयुष सेवाभावी संस्थेच्यावतीने शहरातील नमराह, डॉ. पतंगराव कदम व पोलीस कोविड सेंटरमध्ये २५ फोल्डिंग बेडचे वाटप करण्यात आले. विस्टियॉन टेक्निकल अँड सर्व्हिसेस सेंटर कंपनीने सीएसआर फंडातून हे बेड उपलब्ध करून दिले आहेत.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष अमोल पाटील, उपाध्यक्ष विक्रम चव्हाण, रितेश शेठ, अविनाश पवार, गणेश आनंदे, सतीश साखळकर, विजय खोत, इम्तियाज बोरगावकर, अमोल व्हाटकर, व्यवस्थापक अजित कांबळे आदी उपस्थित होते.
कोरोनाचे संकट लक्षात घेत, बेडअभावी रुग्णांची हेळसांड होऊ नये यासाठी आयुष सेवाभावी संस्था सातत्याने प्रयत्न करत आहे. संस्थेने विस्टियॉन टेक्निकल अँड सर्व्हिसेस सेंटर प्राइवेट लिमिटेड या कंपनीकडे सीएसआर फंडातून फोल्डिंग बेडची मागणी केली होती. कंपनीने तात्काळ २५ बेड उपलब्ध करून दिले.
दरम्यान, संस्थेकडे नमराह फौंडेशन, डॉ. पतंगराव कोविड सेंटर आणि पोलीस कोविड सेंटरकडून बेडची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार बुधवारी या नमराह फौंडेशनला १०, पोलीस कोविड सेंटरला १०, तर डॉ. पतंगराव कदम कोविड सेंटरला ५ बेडचे वाटप करण्यात आले.
यावेळी काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, युवा नेते विशाल पाटील, नगरसेवक अभिजित भोसले, विस्टियॉन कंपनीचे प्रतिनिधी भानुप्रताप देशमुख आदी उपस्थित होते.