कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रभारींविरोधात असंतोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:24 IST2021-05-22T04:24:40+5:302021-05-22T04:24:40+5:30
कवठेमहांकाळचे तहसीलदार बी. जे. गोरे यांना संभाजी ब्रिगेड, आरपीआय, भाजप, राजर्षी शाहू विचारमंच आणि इतर संघटना यांच्यावतीने प्रा. दादासाहेब ...

कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रभारींविरोधात असंतोष
कवठेमहांकाळचे तहसीलदार बी. जे. गोरे यांना संभाजी ब्रिगेड, आरपीआय, भाजप, राजर्षी शाहू विचारमंच आणि इतर संघटना यांच्यावतीने प्रा. दादासाहेब ढेरे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी डॉ. सतीश गडदे हे रुग्णालयात काही आरोग्य कर्मचाऱ्यांना दमदाटी करतात, त्यांचा मानसिक छळ करतात. राजकीय वशिलेबाजी करून सेवा देतात. गोरगरीब रुग्णांना सेवा दिली जात नाही. ते प्रभारी आहेत; परंतु सकाळी नऊ ते बारापर्यंत ते थांबतात. दुपारी ते म्हसोबा गेट येथील खासगी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय व्यवसाय करतात. कोरोनाच्या रुग्णांना त्यांच्या खासगी रुग्णालयात सिटी स्कॅनसाठी सक्तीने पाठविले जाते. शासनाचे लस देण्याचे केंद्रही त्यांनी स्वतःच्या रुग्णालयात मंजूर करून घेतले आहे.
त्यांच्या कारभाराची चौकशी होऊन, त्यांच्यावर कडक कारवाई करावी अन्यथा तालुक्यातील सर्व सामाजिक संघटना, विविध पक्ष तीव्र आंदोलन छेडतील.
निवेदनावर प्रा. दादासाहेब ढेरे, भाजपचे प्रा. अनिल लोंढे, निशिकांत पाटील, सरपंच सूर्यकांत पाटील, संभाजी ब्रिगेडचे ऋतुराज पवार, नंदकुमार कर्पे यांच्या सह्या आहेत.