शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: जयंत पाटील विरोधी आघाडीत बिघाडी, गटनेत्यांच्या भूमिका वेगवेगळ्या असल्याने परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 19:57 IST

Local Body Election: भाजपमध्ये अंतर्गत मतभेद असल्याचे स्पष्ट

अशोक पाटीलईश्वरपूर : एकीकडे आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ईश्वरपुरातील प्रभागानुसार उमेदवारी देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तर दुसरीकडे मात्र गटनेत्यांच्या भूमिका वेगवेगळ्या असल्याने विकास आघाडीमध्ये सध्यातरी बिघाडी आहे. एकमत होण्यासाठी खमके नेतृत्व नसल्याने विकास आघाडी होण्यास विलंब लागत आहे.राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी आनंदराव मलगुंडे प्रचाराला लागले आहेत. दि. ७ रोजी प्रभागानुसार मुलाखतीही सुरू केल्या आहेत. याउलट भाजपमध्येही दुफळी झाल्याने महाडिक, डांगे गट आणि रयत क्रांती संघटना एकत्रित येऊन सावकार काॅलनीमध्ये मुलाखतीचे आयोजन केले आहे. यावेळी आमदार सुरेश खाडे, आमदार सदाभाऊ खोत, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल महाडिक यांनी नगराध्यक्ष पदासह इच्छुक नगरसेवकांच्या चर्चा करून अर्ज घेतले.याउलट उरुण परिसरातून भाजपचे ज्येष्ठ माजी नगरसेवक विक्रम पाटील यांनी आपल्या निवासस्थानी भाजपमधीलच इच्छुक उमेदवारांचे अर्ज घेतले. त्यामुळे सध्यातरी भाजपमध्ये अंतर्गत मतभेद असल्याचे स्पष्ट झाले आहे.विकास आघाडीतील शिंदेसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार यांनी पालिका निवडणुकीची तयारी केली असून वेळ आल्यास सर्व मित्र पक्षांना सोबत घेऊन लढू, अन्यथा सर्वच प्रभागातून स्वतंत्रपणे लढू, असा इशारा विकास आघाडीस दिला आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील आणि माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती याअगोदरच घेतल्या आहेत. फक्त विकास आघाडीची मोट बांधल्यानंतर उमेदवारी जाहीर करतील, असा राजकीय वर्तुळातून अंदाज व्यक्त केला जात आहे.एकंदरीत सर्वच पक्षातील गटनेत्यांच्या भूमिका वेगवेगळ्या असल्याने सध्यातरी आघाडीची बिघाडीचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे या नेत्यांना एकत्रित आणण्यासाठी खमक्या नेतृत्वाची आवश्यकता आहे.

दि. ८ रोजी विकास आघाडीतील सर्व नेत्यांची बैठक घेऊन अगोदर प्रभागानुसार उमेदवारी निश्चित केली जाईल. त्यानंतर विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाचे नाव जाहीर करू. - आनंदराव पवार, जिल्हाप्रमुख शिवसेना

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Jayant Patil Factionalism Hinders Alliance, Leaders' Divergent Roles Impactful

Web Summary : Factionalism plagues Sangli's opposition alliance led by Jayant Patil. Differing roles among group leaders hinder unity. BJP sees internal rifts too. Shiv Sena threatens independent run. Strong leadership needed for alliance.