शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीवेळी 'दोन गटात वाद'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2018 21:35 IST

युवक काँग्रेसच्या जिल्हास्तरीय निवडणूक निकालाची घोषणा गुरुवारी निवडणूक निरीक्षकांनी केल्यानंतर, दादा व कदम गटाच्या कार्यकर्त्यांत वादावादी झाली. सांगली विधानसभा क्षेत्राध्यक्ष निवडीवरून वादंग निर्माण झाले.

सांगली : युवक काँग्रेसच्या जिल्हास्तरीय निवडणूक निकालाची घोषणा गुरुवारी निवडणूक निरीक्षकांनी केल्यानंतर, दादा व कदम गटाच्या कार्यकर्त्यांत वादावादी झाली. सांगली विधानसभा क्षेत्राध्यक्ष निवडीवरून वादंग निर्माण झाले. पराभूत उमेदवाराच्या समर्थकांनी निवडणूक निरीक्षक अधिकाºयांना दमबाजी करीत त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. प्रदेशाध्यक्ष ते जिल्हानिहाय पदाधिकाºयांच्या निवडीसाठी ऑनलाईन मतदान पार पडले होते. प्रदेशव्यतिरिक्त केवळ जिल्ह्यातील पदाधिकाºयांच्या निवडणुकीचा निकाल बुधवारी सांगलीतील निरीक्षक भगवती प्रसाद यांनी जाहीर केला.

सांगलीच्या युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी नगरसेवक मंगेश चव्हाण यांनी बाजी मारली. आठही विधानसभा क्षेत्राध्यक्षांचे निकाल यावेळी जाहीर करण्यात आले. सांगली विधानसभा क्षेत्राच्या अध्यक्षपदाचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये योगेश राणे विजयी झाले. या निवडणुकीत पराभूत झालेले विनायक कोळेकर यांच्यासह समर्थकांनी बोगस मतदानाचा आरोप करीत वाद घातला. बाहेरून मतदार आणून केलेली ही निवड चुकीची असल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केला. निरीक्षक भगवती प्रसाद यांच्याशी कोळेकर यांच्यासह समर्थकांनी हुज्जत घातली. त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकारही घडला. अखेर फेरमतदानाच्या लेखी तक्रारीनंतर कार्यकर्ते परतले. वादावादीच्या या घटनेमुळे काँग्रेस भवनातील वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले होते. काँग्रेस भवनासमोर बराच काळ कोळेकर व त्यांच्या नाराज समर्थकांनी गर्दी केली होती. अन्य पदाधिकाऱ्यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.  

यांच्या अंगावर विजयी गुलाल...निवडणुकीत जिल्हाध्यक्ष पदासाठी मंगेश चव्हाण यांनी ३८०३ इतकी सर्वाधिक मते घेऊन बाजी मारली. द्वितीय क्रमांकाची १ हजार ६०५ मते मिळविणारे संदीप जाधव यांची उपाध्यक्षपदी निवड केली. जिल्हा सरचिटणीस निवडणुकीत दिनेश सोळगे १ हजार ८०२ मतांनी विजयी झाले.  मिरज विधानसभा क्षेत्र अध्यक्ष पदासाठी संभाजी पाटील (३२५), इस्लामपूर - राजू वलांडकर (१४८ ) जतसाठी विकास माने (४९), खानापूर - जयदीप भोसले (३०७), पलूस-कडेगाव प्रमोद जाधव (८०४), शिराळा- प्रताप घाटगे (६८), तासगाव - महेशकुमार पाटील (३२०) यांच्या निवडी झाल्या. सांगली विधानसभा क्षेत्राध्यक्षपदी योगेश राणे (२०१ मते) यांनी बाजी मारली. बुधवारी मतदानावेळी सांगली विधानसभा क्षेत्रासाठी निवडणूक लढविणारे कोळेकर यांनी, निवडणुकीत बाहेरून मतदार आणल्याचा आरोप करीत विरोध केला होता. गुरुवारीही त्यांनी हाच आरोप केला. 

निवड कायदेशीरच : भगवती प्रसादवादावादीच्या घटनेनंतर पत्रकारांशी बोलताना भागवती प्रसाद म्हणाले, सांगली विधानसभा क्षेत्राध्यक्ष निवड कायदेशीररित्या झाली आहे. यात कोणताही घोळ नाही. मतदानात घोळ झाल्याचा आरोप कोळेकर यांच्यासह काहीजणांनी केला आहे. तो चुकीचा आहे. युवकच्या मतदान नोंदणीत फक्त संबंधित युवकांची त्या-त्या जिल्ह्यात नावे घेतली जातात. ते कोणत्या शहराचे आहेत, याची नोंद घेतली जात नाही. त्यामुळे ते नोंद असलेल्या क्षेत्रात मतदानास पात्र आहेत. तरीही त्यांची तक्रार वरिष्ठांकडे कळविली आहे.

तक्रारीत काय म्हटले आहे...कोळेकर व समर्थकांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आॅनलाईन मतदारांची यादी प्रसिद्ध केली असली तरी, त्यामध्ये मतदारांचा पत्ता दिलेला नाही. त्यामुळे बाहेरील जिल्ह्यातील मतदार याठिकाणी येऊन मतदान करू शकतात. आम्हाला याबाबतच संशय आहे. त्यामुळे मतदारांची पडताळणी करून फेरप्रक्रिया राबवावी.  

टॅग्स :congressकाँग्रेसSangli Electionसांगली महानगरपालिका निवडणूकSangliसांगली