शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

निष्ठेची कमान कोणाची, मिरजेत गणेशोत्सवातील स्वागत कमानीवरुन शिवसेना-शिंदे गटात वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 19:29 IST

सत्ताधारी शिंदे गटाचा दावा डावलून शिवसेनेच्या निष्ठावंत गटाला कमानीची परवानगी देणे अडचणीचे ठरणार असल्याने याबाबत सावध भूमिका

मिरज : मिरजेत गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर स्वागत कमानी उभारण्याची तयारी सुरु झाली आहे. मात्र शिवसेनेत फूट पडल्याने ठाकरे व शिंदे गटाने स्वागत कमानीवर हक्क सांगितल्याने निष्ठेची कमान कोणाची याचा फैसला पोलिसांना करावा लागणार आहे.

मिरजेत विसर्जन मिरवणूक मार्गावर गणेश मंडळाच्या स्वागतासाठी स्वागत कमानी उभारण्याची गेल्या ४० वर्षांची परंपरा आहे. गेल्या दोन वर्षाच्या खंडानंतर यावर्षी निर्बंध हटल्याने स्वागत कमानी उभारण्यासाठी विविध पक्ष व संघटना सरसावल्या आहेत. महाराणा प्रताप चौकात यावर्षी शिवसेनेच्या स्वागत कमानीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या प्रतिमेसह निष्ठा हिच सर्वोच्च असल्याचे म्हटले आहे.मात्र शिवसेना व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने एकाच जागेवर स्वागत कमानीसाठी दावा केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. शिवसेनेचे शहरप्रमुख चंद्रकांत मैगुरे यांना कमानीची परवागनी देण्यास शिंदे गटाचे विजय शिंदे यांनी आक्षेप घेत याबाबत पोलिसात तक्रार केली आहे. दोन्ही गटांनी एकाच जागेवर दावा केल्याने याबाबत पोलिसांनी दोघांनाही परवानगी दिलेली नाही.सत्ताधारी शिंदे गटाचा दावा डावलून शिवसेनेच्या निष्ठावंत गटाला कमानीची परवानगी देणे अडचणीचे ठरणार असल्याने याबाबत सावध भूमिका घेण्यात येत आहे. शिवसेनेच्या दोन गटात स्वागत कमानीच्या वादाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याचे पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजGanesh Mahotsavगणेशोत्सवShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे