शिरसगावात शिक्षकाकडून निर्जंतुकीकरण फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:25 IST2021-04-18T04:25:54+5:302021-04-18T04:25:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कडेगाव : शिरसगाव (ता. कडेगाव) येथील शिक्षक अरुण शंकर मांडके यांनी स्वतः पाठीवर २५ लिटर ...

शिरसगावात शिक्षकाकडून निर्जंतुकीकरण फवारणी
लोकमत न्यूज नेटवर्क
कडेगाव
: शिरसगाव (ता. कडेगाव) येथील शिक्षक अरुण शंकर मांडके यांनी
स्वतः पाठीवर २५ लिटर क्षमतेचा पंप
घेऊन रुग्ण सापडलेल्या घरांमध्ये व परिसरात निर्जंतुकीकरण फवारणी केली. हे काम गावातून कोरोना हद्दपार होईपर्यंत अविरत करण्याचा संकल्प
मांडके यांनी केला आहे.
अरुण मांडके शिवाजीनगर येथील भारती विद्यापीठाच्या विद्यालयात शिक्षक
आहेत. शेती आणि सामाजिक कार्याची
आवड असल्यामुळे ते गावातून ये-जा
करून नोकरी करतात. मागील वर्षी त्यांच्यासह कुटुंबीयांना कोरोनाची
बाधा झाली होती. अत्यवस्थ स्थितीतून बाहेर येत त्यांनी कोरोनावर मात केली होती. यामुळे त्यांनी गावात औषध फवारणीस सुरुवात केली आहे. जेथे रुग्ण आढळेल, तेथे २४ तासांच्या आत औषध फवारणी करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.
जोखमीच्या ठिकाणी पीपीई किट
परिधान करून ते स्वतः फवारणी करीत आहेत. इतर सार्वजनिक ठिकाणी
संदीप निकम, इम्रान मुलाणी, जयेश यादव, राहुल मांडके, रावसाहेब मांडके, राजेश यादव, शशिकांत साळुंखे, सतीश मांडके यांनी त्यांना मदत केली.
चौकट :
सदैव तत्पर
गावातील कोरोना रुग्णांना अरुण मांडके योग्य ती दक्षता घेऊन सर्वोतोपरी
मदत करीत आहेत. ग्रामस्थांनी
कोरोना लस घ्यावी, यासाठी जागृती करीत आहेत. संचारबंदी, सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे, यासाठी तरुणांना बरोबर घेऊन उपाययोजना करीत आहेत.