शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

विधानपरिषदेच्या उमेदवारीवरून सांगलीत भाजपमध्ये नाराजी नाट्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 11:26 IST

जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून भाजपमध्ये धुमसत असलेला संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.

ठळक मुद्देनीता केळकर यांची उघड टीका : आयात नेत्यांना किंमत, वर्षानुवर्षे प्रामाणिक राहिलेल्या कार्यकर्त्यांकडे पक्षाचे दुर्लक्ष

सांगली : भाजप नेत्यांवर जहरी टीका करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांच्यासारख्या आयारामांना विधानपरिषदेची उमेदवारी देऊन पक्षातील प्रामाणिक कार्यकर्त्यांना झिडकारण्यात आले, अशी टीका पक्षाचे प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर यांनी केल्याने पक्षांतर्गत वातावरण ढवळून निघाले आहे. जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून भाजपमध्ये धुमसत असलेला संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.

  • जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांना डावलून गोपीचंद पडळकर यांना विधानपरिषदेची संधी दिल्याबद्दल केळकर यांनी नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका करणारे पडळकर उमेदवारी देण्याइतपत वरिष्ठ नेत्यांच्या जवळचे कसे झाले? सातत्याने सोयीची भूमिका घेऊन पडळकरांनी राजकारण केले. रासप, भाजप, वंचित बहुजन आघाडी आणि पुन्हा भाजप असा प्रवास त्यांनी केला. पक्षवाढीसाठी त्यांनी कोणते कार्य केले किंवा भविष्यात त्यांचा कोणत्या माध्यमातून फायदा होणार आहे, हे नेत्यांनी सांगावे.

 

पक्षात मी नवीन असल्याने त्यांची ध्येयधोरणे समजून घेत आहे. विधानपरिषदेसाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी विचारपूर्वक भूमिका घेतली असणार. शिवाजीराव देशमुख यांच्या विचारांचा, माझ्या भूमिकेचा योग्य सन्मान राखला जाईल, असे नेत्यांनी सांगितले आहे. त्यामुळे भविष्यात त्यापद्धतीने ते निर्णय घेतील, असा विश्वास आहे.- सत्यजित देशमुख, भाजप नेत

संधी कोणाला, याचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेत असतात. असे निर्णय दूरगामी विचार करून धोरणात्मक पद्धतीने घेतले जातात. त्यामुळे त्यावर स्थानिक पातळीवर भाष्य करणे योग्य नाही. कोण किती वर्षे पक्षात काम करीत आहे यापेक्षा पक्षाला सध्याच्या परिस्थितीत कोणता चांगला पर्याय वाटतो व त्याचा पक्षाला कितपत फायदा होईल, ही बाब महत्त्वाची असते.- विलासराव जगताप, माजी आमदार, जत

विधानपरिषदेच्या उमेदवारीचा निर्णय घेताना पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकांचा विचार केलेला दिसतो. संबंधित मतदारसंघात पक्षाला पोषक वातावरण कसे राहील, याचीही तजवीज केली आहे. पक्षासाठी जे योग्य आहे, त्यापद्धतीने निर्णय झालेला आहे. पक्षात दीर्घकाळ काम केलेले अनेक दिग्गज लोक जिल्ह्यात आहेत. त्यांच्यापैकी कोणाला संधी मिळाली असती तरी, अन्य काही नाराज झाले असते. त्यामुळे यातून एक वेगळा निर्णय पक्षाने विचारपूर्वक घेतल्याचे दिसत आहे.- शिवाजीराव नाईक, माजी आमदार

टॅग्स :Vidhan Parishadविधान परिषदSangliसांगलीPoliticsराजकारण