सांगलीत २१ फेब्रुवारीस परिचर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:15 IST2021-02-20T05:15:26+5:302021-02-20T05:15:26+5:30

सांगली : चक्रवर्ती राजा ढाले व बुद्धप्रिया नंदा विचार मंचच्यावतीने सांगलीत २१ रोजी परिचर्चा आयोजित करण्यात आली आहे, अशी ...

Discussion in Sangli on 21st February | सांगलीत २१ फेब्रुवारीस परिचर्चा

सांगलीत २१ फेब्रुवारीस परिचर्चा

सांगली : चक्रवर्ती राजा ढाले व बुद्धप्रिया नंदा विचार मंचच्यावतीने सांगलीत २१ रोजी परिचर्चा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती मंचचे प्रमोद सारनाथ व नितीन गोंधळे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले की, गणेशनगर रोटरी सभागृहात दोन सत्रात परिचर्चा होणार आहे. यामध्ये मुंबईतील ज्येष्ठ साहित्यिका प्रा. आशालता कांबळे प्रमुख वक्त्या असणार आहेत. 'राजाभाऊ ढाले : एक धम्म विचार' या विषयावर त्या बोलणार आहेत. अध्यक्षस्थानी प्राचार्य बापूसाहेब माने उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या चर्चासत्रात ॲड. संघराज रुपवते प्रमुख वक्ते असणार आहेत. ते 'संविधान आणि सर्वोच्च न्यायालय : काही नवीन निर्णय' या विषयावर बोलणार आहेत. अध्यक्षस्थानी ॲड. के. डी. शिंदे उपस्थित राहणार आहेत. यानंतर पुरस्करांचे वितरण हाेणार आहे.

Web Title: Discussion in Sangli on 21st February