शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

साहित्य शिक्षणातही भेदभाव

By admin | Updated: February 2, 2015 00:13 IST

राजन खान : विट्यात ३३ व्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे उद्घाटन

विटा : लेखकांनी निर्मळ व तटस्थ माणूस म्हणून लिहिलं पाहिजे. सध्या विद्यापीठातून वेगवेगळे साहित्य शिकवले जाते. त्यात ग्रामीण साहित्य, दलित साहित्य, मुस्लिम साहित्य असे भेद करून ठेवले आहेत. परंतु, याकडे एकदा लेखक व साहित्य म्हणून पाहणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांनी व्यक्त केले. विटा येथे साहित्य सेवा मंडळ, मुक्तांगण वाचनालय व भारतमाता ज्ञानपीठाच्यावतीने आयोजित ३३ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान खान यांनी भूषविले. यावेळी माजी मंत्री आ. डॉ. पतंगराव कदम, स्वागताध्यक्ष माजी आ. सदाशिवराव पाटील, कवी दयासागर बन्ने, बाळासाहेब पवार, प्रमोद पुजारी, रघुराज मेटकरी, अ‍ॅड. अपर्णा केसकर, प्रा. विश्वनाथ गायकवाड, ऋषिकेश मेटकरी उपस्थित होते.अध्यक्षीय भाषणात खान म्हणाले, लेखकांची मंदिरे बांधणारे महाराष्ट्र हे मोठे राज्य आहे. वारकरी संप्रदायाची स्थापना जातीभेद, कर्मकांड संपविण्यासाठी झाली. परंतु, आज जातीभेद संपला का? लेखकांनीही आज जाती-पातीचं लिहिणं थांबविलं पाहिजे. निर्मळ व तटस्थ माणूस म्हणून लिहिता आले पाहिजे. जागतिक कीर्तीचे लेखक व्हायचे असेल, तर एकांगी लिहिणे टाळले पाहिजे. शेतकऱ्यांच्या व्यथा आणि राज्यकर्त्यांचे सिंचनातील घोटाळे हे आता साहित्यात आले पाहिजे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष माजी आ. सदाशिवराव पाटील म्हणाले, विट्यात गेल्या ३३ वर्षांपासून ग्रामीण मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्यामुळे विट्याच्या इतिहासात याची नोंद घ्यावी लागेल. ग्रामीण मराठी साहित्य संमेलनातून साहित्य चळवळ निर्माण व्हावी.स्वागत व प्रास्ताविक रघुराज मेटकरी यांनी केले. यावेळी वैशाली कोळेकर, संमेलनास पृथ्वीराज पाटील, तेजस्विनी खान, ‘मुक्तांगण’चे अध्यक्ष विष्णुपंत मंडले, योगेश मेटकरी, स्वाती शिंदे-पवार, शिवराम पाटील, दीपाली गुजले, अंधकवी चंद्रकांत देशमुखे, अरूण लंगोटे, गंगाधर लकडे, प्रदीप पाटील, श्रीकांत माने, दयानंद बनसोडे, वसंत पाटील, बाळकृष्ण चव्हाण, नवोदित लेखक, कवी उपस्थित होते. आभार अभिजित निरगुडे यांनी मानले. (वार्ताहर) टीव्हीचे अतिक्रमण पतंगराव कदम म्हणाले, साहित्यात मोठी ताकद आहे. नवोदित लेखकांनी व तरूणांनी लोकांना अभिप्रेत साहित्याची निर्मिती केली पाहिजे. सध्या टीव्ही माध्यमाचे अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे तरूण मुले सुसंस्कृत होण्यासाठी ग्रामीण मराठी साहित्य संमेलनांची गरज आहे.