शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

शेतीपंपासाठी नवीन वीजकनेक्शन देणे बंद : शेतकरी वर्गातून संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 22:59 IST

प्रताप महाडिक । कडेगाव : महावितरण कंपनीने ३१ मार्च २०१८ पासून नवीन शेतीपंपाच्या वीज कनेक्शनसाठी पैसे भरून घेणे बंद ...

ठळक मुद्देमहावितरणचा अजब कारभार

प्रताप महाडिक ।कडेगाव : महावितरण कंपनीने ३१ मार्च २०१८ पासून नवीन शेतीपंपाच्या वीज कनेक्शनसाठी पैसे भरून घेणे बंद केले आहे. पारंपरिक पद्धतीने नवीन वीज कनेक्शन देणे बंद करून सौर कृषी पंप घेण्याचा पर्याय शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे. महावितरणच्या या अजब कारभारामुळे शेतकरी वर्गातून संताप व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेतात विहिरी खोदून पाईपलाईन केल्या आहेत, परंतु आता वीज कनेक्शन मिळत नसल्यामुळे हे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. याला महावितरणचे चुकीचे धोरण कारणीभूत ठरत आहे. महावितरणने नवीन वीज कनेक्शन देणे बंद केले आहे. यामुळे कर्जबाजारी झालेले हजारो शेतकरी देशोधडीला लागतील, अशी भीती व्यक्त होत आहे.शासनाने वीज कनेक्शन देणे बंद करून सौर कृषी पंपाचा पर्याय ठेवला आहे. यावर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बहुतांशी शेतकºयांनी सौरप्रणाली नको, आम्हाला महावितरणकडून वीज कनेक्शन हवे, अशी मागणी केली आहे.

३१ मार्च २०१८ पूर्वी ज्या शेतकºयांनी वीज कनेक्शनसाठी पैसे भरले आहेत, त्यामधील ज्या शेतकºयांची प्रकरणे मंजूर झालेली आहेत, त्या शेतकºयांना आता नवीन वीज कनेक्शन देणे बंद करून उच्च दाब वितरण प्रणाली ‘एचव्हीडीएस’अंतर्गत स्वतंत्र ट्रान्सफॉर्मरचा पर्याय दिला आहे.या प्रणालीतून एक किंवा दोन शेतकºयांसाठी स्वतंत्र रोहित्र (डीपी) बसवून थेट रोहित्रावरूनच कृषीपंपाला जोडणी देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. ज्या शेतकºयांनी शेती पंपाच्या वीज कनेक्शनसाठी पाच ते सहा वर्षांपासून पैसे भरले आहेत, त्यांना अद्यापही बरीच जोडणी बाकी असल्याने शेतकºयांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.

महावितरणच्या या गलथान कारभाराविरोधात अनेकदा आंदोलने झाली, निवेदन देण्यात आली; मात्र महावितरण कंपनीने उपलब्ध साधनसामग्री आणि सुविधा, उपलब्ध वीज आणि लागणारी वीज आणि महत्त्वाचे म्हणजे नवनिर्मितीसाठी येणारा खर्च याचा ताळमेळ बसत नसल्याचे कारण दाखवून नवीन वीज कनेक्शनसाठी अर्ज घेणे बंद केले आहे, असे अधिकारी सांगत आहेत.शासनाने यापुढे सौरऊर्जेवर भर देण्याचे ठरवल्याने यापुढे आता सौरऊर्जेवरील पंप देण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकºयांना दिवसा वीज मिळेल आणि विजेचा वापरही नियंत्रणात राहील, असे सांगितले जाते. परंतु तलावांमध्ये पाणीपातळी कमी-जास्त होत असल्यामुळे पाणी उचलण्याचे परवाने घेऊन ज्यांनी पाईपलाईन केली आहे, त्या शेतकºयांना एकाच ठिकाणी स्थिर राहणारी सौर कृषी पंप प्रणाली बसविणे अडचणीचे होणार आहे. शासनाने सौर कृषी पंप आणि पारंपरिक वीज कनेक्शन दोन्ही पर्याय शेतकºयांसमोर ठेवले पाहिजेत, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.शेतकºयांची गळचेपी : थांबवावीगेल्या वर्षापासून शेतकºयांना नवीन वीज जोडणीसाठी प्रस्ताव घेण्याचे काम बंद आहे. शासनाने आता सौरऊर्जेबाबत कार्यवाही सुरू केली. २०१८ पूर्वीच्या मंजूर प्रकरणांसाठी उच्चदाब विद्युत प्रणालीतून शेतकºयांना थेट जोडणी देण्याचा निर्णयही झाला, पण त्याचीही अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. शासनाने शेतकºयांची गळचेपी थांबवाबी, असे कडेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते डी. एस. देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगलीwater transportजलवाहतूकmahavitaranमहावितरण