शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

ई-चलनामुळे होणार बेशिस्तपणा उघड... .. : तर परवाना रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 00:49 IST

जिल्हा पोलीस दलाने पोलिसांच्या हातात पावती पुस्तक ऐवजी दिलेले ई-चलन मशीन आता बेशिस्त वाहनचालकांसाठी कर्दनकाळ ठरणार आहे.

ठळक मुद्देबेशिस्त वाहनचालक याचा गैरफायदा घेत होते. परंतु आता ई-चलन मशीनमुळे वाहनचालकांची सर्व माहिती एकत्रित होणार आहे.

सातारा : जिल्हा पोलीस दलाने पोलिसांच्या हातात पावती पुस्तक ऐवजी दिलेले ई-चलन मशीन आता बेशिस्त वाहनचालकांसाठी कर्दनकाळ ठरणार आहे. वाहनचालकावर कितीवेळा कारवाई केली, याची इत्यंभूत माहिती संग्रहित राहणार असून, दोन हजारांपर्यंत दंडाची रक्कम झाल्यास संबंधित वाहनचालकाचा परवानाही रद्द करण्यात येणार आहे. एका क्लिकवर वाहनचालकांचा तपशील समोर येणार असल्याने गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी आणि उघड होण्यास हे ‘ई-चलन मशीन’ पोलिसांठी फायद्याचे ठरणार आहे.

वाहतूक पोलिसांच्या हाती दंडाची रक्कम भरून घेण्यासाठी असणारे पुस्तक आता कालबाह्य ठरले आहे. महामार्ग पोलीस आणि वाहतूक पोलिसांना ई-चलन मशीन देण्यात आले आहे. ‘एक राज्य एक चलन’ प्रणाली अंतर्गत सातारा जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी झाली. जिल्ह्यात ५० ई-चलन मशीन उपलब्ध झाल्या आहेत. त्यातील ३५ सातारा पोलिसांकडे तर १५ मशिन्स महामार्ग पोलिसांकडे देण्यात आल्या आहेत. हे ई-चलन मशीन जिल्हा पोलीस दलात कार्यान्वित करण्यात आल्यामुळे याचा नेमका पोलिसांना काय फायदा होणार आहे, याची माहिती घेतली असता पोलिसांसाठी हे मशीन फायद्याचे असून, बेशिस्त वाहनचालकांसाठी मात्र कर्दनकाळ ठरणार असल्याचे समोर येत आहे.

पूर्वी पावती पुस्तकाद्वारे दंड आकारण्यात येत होता.एखादा दंड आकारल्यानंतर पुन्हा तोच वाहनचालक वाहतुकीचे उल्लंघन करताना सापडला तर त्याची माहिती पोलिसांकडे नसायची. पावतीमुळे कारवाई केलेल्या वाहनचालकांचा डाटा संग्रहित करण्याची सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे बेशिस्त वाहनचालक याचा गैरफायदा घेत होते. परंतु आता ई-चलन मशीनमुळे वाहनचालकांची सर्व माहिती एकत्रित होणार आहे. कोणत्याही वाहनचालकाने कितीवेळा नियम मोडला, हे समजणार आहे. त्या वाहनचालकाचा गाडी नंबर ई-चलन मशीनवर टाकल्यास संबंधित वाहनचालकाची करतूद समोर येणार आहे.गुन्हेगारी कारवाया रोखण्यास होणार मदतकोणत्याही वाहनचालकाला ई-चलन मशीनद्वारे दोन हजारांपर्यंत दंड झाल्यास त्याचा परवाना रद्द करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना तसे कळविण्यात येणार आहे. एखादा वाहनचालक दंडाची रक्कम न भरता निघून गेल्यास त्याच्या नावावर दंडाची रक्कम ई चलन मशीनमध्ये फिड केली जाणार आहे. मात्र, पुन्हा काही दिवसांनंतर त्याच वाहनचालकाला पोलिसांनी पकडल्यानंतर त्याच्याकडून थकीत दंडाची रक्कमही वसूल केली जाणार आहे. या मशीनमध्ये कारवाई करण्यात आलेल्या वाहनांचा नंबर संग्रहित असल्यामुळे गुन्हेगारी कारवाया उघडकीस आणि रोखण्यास मदत होणार असल्याचे एका पोलीस अधिकाºयाने सांगितले. 

दुसरा टप्पा कॅशलेसचा..व्यवहारामध्ये पारदर्शकता यावी, यासाठीही ई चलन मशीनची अंमलबजावणी करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये वाहन चालकांकडून दंडाची रक्कम रोख स्वरुपात वसूल केली जाणार आहे. मात्र, त्यानंतर दुसºया टप्प्यात ई-चलन पूर्णपणे कॅशलेस करण्याच्या हालचाली आतापासून वरिष्ठ पातळीवर सुरू झाल्या आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीtraffic policeवाहतूक पोलीस