शिगावमध्ये आपत्ती व्यवस्थापन समिती दक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:25 IST2021-05-10T04:25:57+5:302021-05-10T04:25:57+5:30
ते म्हणाले आरोग्य विभाग प्रत्येक घरात भेट देऊन कोणी आजारी आहे का ते पाहत आहेत. नागरिकांनी आपल्याच सुरक्षेसाठी ...

शिगावमध्ये आपत्ती व्यवस्थापन समिती दक्ष
ते म्हणाले आरोग्य विभाग प्रत्येक घरात भेट देऊन कोणी आजारी आहे का ते पाहत आहेत. नागरिकांनी आपल्याच सुरक्षेसाठी त्यांना घरी माहिती देऊन सहकार्य करावे. कोरोना प्रतिबंधक क्षेत्रात जंतुनाशक फवारणी सुरू आहे. गाव १२ तारखेपर्यंत पूर्ण कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे. जे नियमाचे उल्लंघन करतील त्यांच्यावर दंडात्मक कडक कारवाई करत आहोत.
चाैकट
गैरसमज पसरवू नका
गावातील कोरोना बाधित रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. कुठेही फिरत नाहीत याचा पाठपुरावा सातत्याने दक्षता समिती व ग्रामपंचायतीमार्फत होत आहे. कोरोनाबाधित रुग्ण बाहेर फिरतात अशा अफवा, गैरसमज पसरवून त्या कुटुंबांना नाहक त्रास देऊ नये. त्यांना मानसिक आधाराची गरज आहे, असे मत उत्तम गावडे यांनी व्यक्त केले.