शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
2
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
3
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
4
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
5
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
6
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
7
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
8
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
9
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
10
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
11
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
12
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
13
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
14
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
15
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
16
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
17
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
18
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
19
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
20
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक प्रशिक्षणात नाराजी

By admin | Updated: September 16, 2014 23:45 IST

समन्वयाचा अभाव : लोकसभेच्या भत्त्याबाबत विचारणा

सांगली : तहसील कार्यालये आणि जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक कामात असलेल्या अधिकाऱ्यांमध्ये असलेला समन्वयाचा अभाव, पदांबाबतची संभ्रमावस्था आणि भत्ता देण्यास होत असलेल्या विलंबाबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आज मंगळवारी निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमात नाराजी व्यक्त केली. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात विधानसभा निवडणुकीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून सूचना मांडण्यात याव्यात, अशा अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या. यावेळी सूचनांपेक्षा नाराजीच अधिक व्यक्त झाली. निवडणूक खर्च निरीक्षकांना वाहने देताना नसलेले नियोजन, दोन्ही कार्यालयांमध्ये असलेला समन्वयाचा अभाव, पोलीस संरक्षणाची कमतरता तसेच प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना येत असलेल्या अडचणी याबाबत नाराजी व्यक्त झाली. कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या समस्यांचे निराकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तात्काळ केले जावे, अशी अपेक्षाही काही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीत काम केलेल्या कर्मचाऱ्यांना विधानसभा निवडणूक आली तरी अद्याप भत्ते देण्यात आले नाहीत. याबाबतही कर्मचाऱ्यांनी विचारणा केली. यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी भत्त्यापोटीची रक्कम प्राप्त झाली असून, ती कर्मचाऱ्यांना निश्चितपणे मिळेल, असे सांगितले. मिरज विधानसभा मतदारसंघासाठी सहाय्यक निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून दोघांना स्वतंत्र अधिकाऱ्यांमार्फत नियुक्तीपत्रे देण्यात आले होते. त्याबाबतही प्रशिक्षण कार्यक्रमानंतर अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू होती. काही द्वितीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांना गत लोकसभा निवडणुकीत प्रथम श्रेणीतील कामाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. प्रत्यक्षात भत्ता मिळताना त्यांना कोणत्या श्रेणीनुसार मिळणार, याची कल्पना कोणत्याही अधिकाऱ्याला नाही. त्याबाबची माहितीही कोणी दिलेली नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या विविध पथकांच्या प्रमुखांचे आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अल्पबचत सभागृहात आज (मंगळवार) झाले. या प्रशिक्षण शिबिरास निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा कोषागार अधिकारी अश्विनी भोसले-जाखलेकर यांच्यासह सर्व संबंधित पथकांचे प्रमुख व अधिकारी उपस्थित होते.यावेळी बर्डे म्हणाल्या की, जिल्ह्यतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी तीन भरारीपथके, तसेच प्रत्येकी तीन स्थिर सर्वेक्षण पथके, खर्च विषयक पथक, व्हीडीओ पथक अशी आवश्यक सर्व पथके कार्यान्वित करण्यात आली असून, प्रत्येक पथकप्रमुखांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार काम करावे. सर्व पथकांनी विधानसभा निवडणूक मुक्त, निर्भय आणि शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी त्यांना दिलेल्या अधिकारांचा प्रभावीपणे वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले. निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी सूचना करून उपजिल्हा निवडणूक अधिकारी मौसमी बर्डे म्हणाल्या, खर्चविषयक पथकातील सहाय्यक खर्च निरीक्षकांनी उमेदवारांच्या खर्चाबाबत आयोगाच्या सूचनेनुसार आवश्यक कार्यवाही करावी, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)‘वॉच’साठी ४८ पथके कार्यान्वित जिल्ह्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी भरारी पथके, स्थिर सर्वेक्षण पथके, व्हीडीओ पथक, लेखापथक अशी ४८ पथके कार्यान्वित केली असून, या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपआपली कर्तव्ये चोखपणे पार पाडावीत, अशी सूचना उपजिल्हा निवडणूक अधिकारी मौसमी बर्डे यांनी आज (मंगळवार) येथे केली. पथकांतील कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात त्या बोलत होत्या.