फकिरवाडीत महिलेच्या खूनप्रकरणी पतीसह दिराला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:25 IST2021-05-15T04:25:46+5:302021-05-15T04:25:46+5:30

शिराळा : फकिरवाडी (ता. शिराळा) येथे चारित्र्याच्या संशयावरून सुवर्णा सुभाष पवार (वय २७) हिच्यावर धारदार शास्त्राने वार करून ...

Dira along with her husband arrested in Fakirwadi murder case | फकिरवाडीत महिलेच्या खूनप्रकरणी पतीसह दिराला अटक

फकिरवाडीत महिलेच्या खूनप्रकरणी पतीसह दिराला अटक

शिराळा : फकिरवाडी (ता. शिराळा) येथे चारित्र्याच्या संशयावरून सुवर्णा सुभाष पवार (वय २७) हिच्यावर धारदार शास्त्राने वार करून खून केल्याप्रकरणी मुख्य संशयित पती सुभाष सदाशिव पवार (३२) व त्याचा भाऊ दिगंबर सदाशिव पवार (२७) या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांना दि. १८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

शनिवारी (दि. ८) दुपारी एकच्या दरम्यान सुवर्णाचा चारित्र्याच्या संशयावरून शेतामध्ये खून करण्यात आला होता. त्यानंतर सुभाष पवार याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याला सुरुवातीला कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात व नंतर सांगली येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी त्याला रुग्णालयातून सोडण्यात आले. यावेळी सुभाष व त्याचा भाऊ दिगंबर यास पोलिसांनी तेथेच अटक केली.

या खूनप्रकरणी पती सुभाष पवार, सासू बबूताई सदाशिव पवार, सासरा सदाशिव बाळू पवार, दीर दिगंबर सदाशिव पवार यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात सुवर्णा यांचे वडील भगवान श्रीपती पाटील (रा. शित्तूर तर्फ वारूण) यांनी फिर्याद दिली होती.

Web Title: Dira along with her husband arrested in Fakirwadi murder case