दिनकर पाटील यांचाही विधानसभेसाठी शड्डू
By Admin | Updated: September 7, 2014 00:19 IST2014-09-07T00:18:12+5:302014-09-07T00:19:19+5:30
सांगली : लोकसभा निवडणुकीत भाजपला उघडपणे मदत करणारे माजी आ. दिनकर पाटील यांनी आज विधानसभेसाठी

दिनकर पाटील यांचाही विधानसभेसाठी शड्डू
सांगली : लोकसभा निवडणुकीत भाजपला उघडपणे मदत करणारे माजी आ. दिनकर पाटील यांनी आज विधानसभेसाठी रणशिंग फुंकले. निष्क्रिय उमेदवारांमुळे मैदानात उतरत असल्याचे सांगून त्यांनी पक्षीय कारवाईला सामोरे जाण्याचीही तयारी असल्याचे स्पष्टीकरण शनिवारी पत्रकार परिषदेत केले.
ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला मी मदत केली होती. त्याबाबत पक्षाने तयार केलेला अहवाल योग्यच आहे. विधानसभेच्या निवडणुकांमध्ये यापूर्वी माझ्याविरोधात वसंतदादांच्या वारसदारांनी काम केले होते. आघाडी धर्माचे पालन त्यांनीसुद्धा कधी केले नाही. सांगली विधानसभा मतदारसंघात वारंवार मदन पाटील यांनाच उमेदवारी दिली जात आहे. वास्तविक त्यांनी त्यांच्या कार्यकाळात शहरासाठी कोणतेही काम केले नाही. म्हणूनच त्यांच्या निष्क्रियतेला कंटाळून जनतेने गत निवडणुकीत संभाजी पवारांना विजयी केले.
सध्या विधानसभा निवडणुकीसाठी मैदानात उतरण्याची तयारी करीत असलेल्यांमध्ये एकही सक्षम उमेदवार नाही. मदन पाटील यांना तिकीट नाकारून जर चांगला सक्षम पर्याय कॉंग्रेसने दिला तर माझ्या उमेदवारीबाबत मी पुनर्विचार करू शकतो, मात्र तशी शक्यता दिसत नाही. दादा घराण्यातील निष्क्रिय लोकांना आता जनता कंटाळली आहे. त्यामुळे मी विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)