शेतीनिष्ठ दिलीपराव पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:26 IST2021-04-04T04:26:44+5:302021-04-04T04:26:44+5:30
आज एक वर्ष झाले दिलीप पाटील आबांना (पप्पा) जाऊन. ६७ वर्षे हे काही त्यांच्या जाण्याचे वय नाही. आजही ते ...

शेतीनिष्ठ दिलीपराव पाटील
आज एक वर्ष झाले दिलीप पाटील आबांना (पप्पा) जाऊन. ६७ वर्षे हे काही त्यांच्या जाण्याचे वय नाही. आजही ते आमच्यात नाहीत, असे मनाला वाटत नाही. त्यांच्या नावापुढे कै. जोडताना अजूनही आम्हाला त्रास होतो. त्यांना जगण्याची खूप इच्छा होती, म्हणूनच त्यांनी आजाराला दोन महिने खंबीरपणे झुंज दिली. त्यांच्या कर्तृत्वाने आम्हाला ओळख मिळाली आणि त्यांच्या जाण्याने पोरकेपणा या शब्दाचा अर्थ समजला.
कुटुंबवत्सल, प्रेमळ स्वभाव आणि वागण्या-बोलण्यात करारीपणा, सडेतोडपणा आयुष्यभर त्यांच्यासोबत राहिला. सुसंस्कृत वागणे आणि समाजप्रियता हे मोठ्या भावातील गुण त्यांनी कायम आत्मसात केले. त्यांच्या शेती शिक्षणाचा (बी.एस्सी. ॲग्री) पुरेपूर उपयोग त्यांनी शेती व्यवसायात केला. शिक्षणाचे महत्त्व असल्यामुळेच स्वत:च्या मुलीला लग्नात त्यांनी लॅपटॉप भेट दिला. वाचन, संगीत, सिनेमा यांची आवड त्यांनी जोपासली. आयुष्याच्या प्रवासात प्रत्येक वळणावरची नाती जपली. मुलगा, भाऊ, प्रेमळ पती या भूमिकेतून जात असताना आबा सर्वोत्तम पिता होते. त्यांनी आयुष्यभर मोठ्या भावाला साथ दिली, त्यामुळेच की काय, त्यांच्या जाण्याचा विरह विजयभाऊ सहा महिनेही सहन करू शकले नाहीत. आबांनी कष्टाने संसार उभा केला आणि अचानक निघून गेले. त्यांचं नाव टिकविण्याचं आव्हान आमच्यापुढे आहे.
- शिवराज पाटील, उरुण इस्लामपूूर