शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: आवळाईत उपसरपंचपदी तृतीयपंथीयास संधी, आटपाडी तालुक्यातील पहिलीच घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 16:48 IST

आटपाडी : आवळाई (ता. आटपाडी) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रथमच एका तृतीयपंथीयास संधी मिळाली आहे. तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे. २०२२ ...

आटपाडी : आवळाई (ता. आटपाडी) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रथमच एका तृतीयपंथीयास संधी मिळाली आहे. तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे.२०२२ साली झालेल्या आवळाई ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तृतीयपंथी दिलीप हेगडे निवडून आले होते. मावळत्या उपसरपंच राजश्री शेंडे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागी दिलीप हेगडे यांची निवड करण्यात आली आहे.आवळाईत लोकनियुक्त सरपंचपदी गजेंद्र पिसे विजयी झाले होते, तर सुरुवातीला उपसरपंचपदी राजश्री शेंडे यांची निवड करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी राजश्री शेंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागी तृतीयपंथी दिलीप हेगडे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली. आटपाडी तालुक्यात दिलीप हेगडे हे प्रथमच तृतीयपंथी उपसरपंच म्हणून काम पाहणार आहेत.गावगाड्यामध्ये सर्व नागरिकांना समान हक्क घटनेने दिले आहेत. गावातील मतदारांनी एका तृतीयपंथीयावर विश्वास ठेवत ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून दिले. आता ग्रामपंचायत सदस्यांनीही हेगडे यांच्यावर विश्वास ठेवत उपसरपंच पदाची संधी दिली. एक माणूस म्हणून तृतीयपंथीयांंस समाजात मिळणारी वागणूक खोटी ठरवत आवळाईकरांनी दिलीप हेगडे यांना उपसरपंचपदाचा मान दिला. यामुळे आटपाडी तालुक्यामध्ये आवळाईच्या ग्रामपंचायत सदस्यांचे कौतुक हाेत आहे. गावच्या विकासासाठी आम्हीही योगदान देऊ शकतो, असा विश्वास दिलीप हेगडे यांनी निवडीनंतर व्यक्त केला.निवडीनंतर आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह भाजपचे युवा जिल्हाप्रमुख अनिल पाटील, भारत पाटील यांनी हेगडे यांचे अभिनंदन केले.

टॅग्स :Sangliसांगलीgram panchayatग्राम पंचायतTransgenderट्रान्सजेंडर