दिग्विजय सूर्यवंशी यांचा सांगलीत सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:48 IST2021-03-13T04:48:31+5:302021-03-13T04:48:31+5:30

महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांचा सत्कार करताना संजय परमने, आनंदा कोरे, वैभव शिंदे, विशाल शिंदे. लोकमत न्यूज नेटवर्क आष्टा : ...

Digvijay Suryavanshi felicitated in Sangli | दिग्विजय सूर्यवंशी यांचा सांगलीत सत्कार

दिग्विजय सूर्यवंशी यांचा सांगलीत सत्कार

महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांचा सत्कार करताना संजय परमने, आनंदा कोरे, वैभव शिंदे, विशाल शिंदे.

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टा : सांगली येथील श्रीराम रामदयाळ मालू हायस्कूलचे माजी विद्यार्थी दिग्विजय सूर्यवंशी यांची सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या महापौरपदी निवड झालेबद्दल त्यांचा माजी विद्यार्थी, माजी शिक्षक संघटना व आजी शिक्षक यांच्या वतीने करण्यात आला. यावेळी संघटनेचे माजी अध्यक्ष संजय परमणे, आनंदा कोरे, वैभव शिंदे प्रमुख उपस्थित होते.

वैभव शिंदे म्हणाले, दिग्विजय सूर्यवंशी हे आपल्या शाळेचे विद्यार्थी आहेत. आज महापौर पदावर नियुक्ती झाली हा आपल्या सर्वांना अभिमान आहे.

महापौर दिग्विजय सूर्यवंशी म्हणाले, मालू हायस्कूलमधील माझा सत्कार हा मला प्रेरणादायी आहे. या हायस्कूलमध्ये माझ्यावर संस्कार झाले.

मुख्याध्यापक कुलकर्णी यांनी स्वागत केले. यावेळी नगरसेवक विशाल शिंदे, संजय काळोखे, संजय खराडे, अभिजीत म्हेत्रे, जितेंद्र वायदंडे, प्रसाद जामसंडेकर, रंजीत घळसासी, अनंत पत्की, उदय निकम उपस्थित होते.

Web Title: Digvijay Suryavanshi felicitated in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.