शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

कडेगाव तालुक्यात धान्य मिळण्यात ऑनलाइन नोंदीची अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 14:00 IST

ऑनलाइन नोंदणी केली असेल त्यांनाच दिले आहे. मात्र वंचितांना न्याय कधी मिळणार हा प्रश्न आहे . प्राधान्य कुटुंब लाभार्थीं शिधापत्रिका धारकाप्रमाणेच ज्या केसरी शिधापत्रिका धारकांचे उत्पन्न ४४  हजाराच्या आत आहेत व त्या अद्याप ऑनलाईन झाल्या नाहीत अशा

ठळक मुद्दे कडेगाव तालुक्यातील चित्र : वंचित केसरी शिधापत्रिका धारकांची व्यथा 

प्रताप महाडिक 

कडेगाव : कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन जाहीर केले असले तरी कोणीही व्यक्ती उपाशीपोटी राहणार अशी घोषणा शासन आणि प्रशासनाने केली  आहे. सर्व पात्र शिधापत्रिका धारक कुटुंबाना धान्य मिळेल असे बोलले जात आहे.मात्र ऑनलाइन नोंदणी न झालेल्या केसरी शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळालेले नाही .कडेगाव तालुक्यातील कित्येक केसरी  शिधापत्रिकाधारक ऑनलाईन प्रक्रियेतील तांत्रिक अडचणीमुळे वंचित आहेत.

आपल्या  प्रशासनाने  परराज्यातील नागरिकांनाची  धान्य जेवणाची व्यवस्था केली आहे. हे संकटकाळात करणे योग्यच आहे . मात्र कडेगाव तालुक्यातील  कित्येक केसरी शिधापत्रिका धारक असलेल्या नागरिकांना ऑनलाइन नोंदणी केलेली नसल्याने रेशन धान्य मिळण्यापासून वंचित राहावे लागले आहे. याबाबत शासनस्तरावर वेळीच निर्णय घेणे गरजेचे आहे.

शासनाने केशरी शिधापत्रिकाधारकांनी कार्डावर आरसी नंबर घेऊन नोंदणी  केली होती .मात्र अजूनही त्यांची   शासनाच्या  प्रणालीतील तांत्रिक अडचणीमुळे ऑनलाइन नोंदणीही झालेली नाही. त्यामुळे त्यांना ऐन गरजेच्या वेळी रेशन दुकानात  धान्य मिळाले नाही .संचारबंदी असल्यामुळे  दाद कोणाकडे मागायची हा प्रश्नही त्यांच्यासमोर उभा आहे. 

कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव पाहून शासनाने सगळीकडे लॉक डाऊन केले आहे. त्यामुळे काम बंद झाले. शासनाने लॉक डाऊन केला असला तरी कोणीही अन्नावाचून उपाशी राहणार नाही असे सांगितले आहे. ज्यांच्या शिधापत्रिकाची   ऑनलाइन नोंदणी केली असेल त्यांनाच दिले आहे. मात्र वंचितांना न्याय कधी मिळणार हा प्रश्न आहे .प्राधान्य कुटुंब लाभार्थीं शिधापत्रिका धारकाप्रमाणेच ज्या केसरी शिधापत्रिका धारकांचे उत्पन्न ४४  हजाराच्या आत आहेत व त्या अद्याप ऑनलाईन झाल्या नाहीत अशा शिधापत्रिका धारकांना ऑफलाईन पद्धतीने  सवलतीच्या दरातच धान्य द्यावे. तसेच जे रेग्युलर केसरी शिधापत्रिका धारक आहेत आणि त्यांचेही ऑनलाईन झाले नाही अशा शिधापत्रिका धारकांना देखील ऑफलाईन ने धान्य द्यावे अशी मागणी होत आहे.ऑफ लाईन नोंद घ्यावी : सतीश मांडके सरपंच शिरसगाव ज्याचे शिधापत्रिकाची   ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण झालेली नाही त्यांनी तात्काळ नोंद व्हावी.यामध्ये काही तांत्रिक अडचण असेल तर ऑफलाईन पद्धतीने नोंद करावी. अन्यथा  प्रशासनाने या वंचित कुटुंबाना धान्य व  जीवनावश्यक  वस्तूंची किट देऊन त्यांची  समस्या सोडविण्याचा प्रयत्न करावा .

टॅग्स :Sangliसांगलीonlineऑनलाइन