कोरोना लसीकरणामध्ये मंदावलेल्या पोर्टलची अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:28 IST2021-01-19T04:28:25+5:302021-01-19T04:28:25+5:30
सांगली : जिल्ह्यात आज, मंगळवारी पुन्हा कोरोनाचे लसीकरण होणार आहे. शनिवारी (दि. १६) एक दिवस लसीकरण झाल्यानंतर ते थांबले ...

कोरोना लसीकरणामध्ये मंदावलेल्या पोर्टलची अडचण
सांगली : जिल्ह्यात आज, मंगळवारी पुन्हा कोरोनाचे लसीकरण होणार आहे. शनिवारी (दि. १६) एक दिवस लसीकरण झाल्यानंतर ते थांबले होेते.
जिल्हाभरात २६ हजार ५०० आरोग्य कर्मचाऱ्यांची लसीकरणासाठी पोर्टलवर नोंद झाली आहे. दररोज ९०० जणांना लस टोचण्याचे नियोजित आहे, पण कोविन पोर्टल मंदगतीने सुरू असल्याने पहिल्या दिवशी फक्त ४५६ जणांनाच लस टोचण्यात आली होती. ॲपमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने रविवारी व सोमवारी लसीकरण होऊ शकले नाही. पोर्टल सोमवारी सुरू झाल्याने मंगळवारी पुन्हा लसीकरण केले जाणार आहे. पोर्टल अद्याप खूपच मंदगतीने काम करत असल्याने मंगळवारी पूर्ण क्षमतेने लसीकरणाबाबत शंकाच आहे.
प्रभारी जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांनी सांगितले की, नऊ केंद्रात प्रत्येकी शंभरप्रमाणे ९०० जणांना लस टोचण्याचे नियोजन आहे. मंगळवारी सकाळी मोहिमेला पुन्हा सुरुवात होईल. शनिवारी ९०० पैकी ४५६ जणांना लस टोचली होती, त्यातील राहिलेल्यांना मंगळवारी टोचली जाईल.
----------