मिरजेत दोन वर्षांनंतर डिझेल दाहिनी पुन्हा सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:25 IST2021-05-23T04:25:47+5:302021-05-23T04:25:47+5:30
मिरज : मिरजेतील कृष्णाघाट येथील डिझेल दाहिनी चालविण्यासाठी ठेकेदाराची नियुक्तीसाठी मनपा प्रशासनाने निविदा काढली आहे. यामुळे ...

मिरजेत दोन वर्षांनंतर डिझेल दाहिनी पुन्हा सुरू होणार
मिरज : मिरजेतील कृष्णाघाट येथील डिझेल दाहिनी चालविण्यासाठी ठेकेदाराची नियुक्तीसाठी मनपा प्रशासनाने निविदा काढली आहे. यामुळे दोन वर्षांनंतर पुन्हा कृष्णाघाटावर डिझेल दाहिनी सुरू होणार आहे.
२०१९ मध्ये महापुरात उद्ध्वस्त झालेली मिरजेतील डिझेल दाहिनी दुरुस्ती केली. मात्र, दुरुस्ती झाल्यानंतरही गेले सहा महिने डिझेल दाहिनी चालविण्यासाठी ठेकेदार नियुक्तीबाबत दुर्लक्ष करण्यात आल्याने डिझेल दाहिनी बंदच आहे. ठेकेदार नियुक्तीसाठी आयुक्तांनी आदेश दिल्यानंतरही आरोग्य विभाग चालढकल करीत असल्याने मिरजेतील आधार संस्थेचे मोहन वाटवे यांनी यासाठी दीड वर्ष पाठपुरावा केला. डिझेल दाहिनी सुरू करण्यासाठी सामाजिक संघटनांनी आंदोलनाचा इशारा प्रशासनाला दिला.
या पार्श्वभूमीवर मनपा आरोग्य अधिकाऱ्यांनी मिरजेच्या डिझेल दाहिनीसाठी ठेकेदार नियुक्तीची निविदा काढली आहे. ठेकेदाराची नेमणूक झाल्यानंतर डिझेल दाहिनी कार्यान्वित होणार असल्याने नागरिकांची सोय होणार आहे.
चाैकट
कोरोना साथीदरम्यान महापालिकेकडून दररोज मिरजेत मोठ्या संख्येने मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. कृष्णाघाटावरील बंद डिझेल दाहिनी सुरू झाली तरी येथे कोरोना बाधितांच्या अंत्यसंस्कारास स्थानिकांचा विरोध असल्याने मिरजेत पंढरपूर रोड स्मशानभूमीतच होणार आहेत.