मिरज कृष्णाघाट स्मशानभूमीतील डिझेल दाहिनी सुरू हाेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:23 IST2021-02-05T07:23:59+5:302021-02-05T07:23:59+5:30

यावेळी स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे, उपमहापौर आनंदा देवमाने, नगरसेवक करण जामदार, महापालिकेचे सहायक आयुक्त दिलीप घोरपडे, ...

Diesel right at Miraj Krishnaghat cemetery will start | मिरज कृष्णाघाट स्मशानभूमीतील डिझेल दाहिनी सुरू हाेणार

मिरज कृष्णाघाट स्मशानभूमीतील डिझेल दाहिनी सुरू हाेणार

यावेळी स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे, उपमहापौर आनंदा देवमाने, नगरसेवक करण जामदार, महापालिकेचे सहायक आयुक्त दिलीप घोरपडे, मोहन वाटवे, श्रीराम नातू, सुनील मोरे उपस्थित होते.

कृष्णाघाट स्मशानभूमीत गतवर्षी महापुराचे पाणी शिरल्याने डिझेल दाहिनी बंद पडली आहे. आयुक्तांनी डिझेल दाहिनी तातडीने दुरुस्तीचे आदेश दिले. स्मशानभूमीत वीज व पाण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी स्मशानभूमीच्या मागील बाजूस रक्षा विसर्जनाची स्वतंत्र व्यवस्था, नदीपात्रापर्यंत पायऱ्या करणे, दहन कट्ट्याची संख्या वाढविण्याची, तसेच येथील रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी यावेळी आयुक्तांकडे करण्यात आली. येथे सुरक्षारक्षक नेमावा, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. कृष्णा नदीच्या पुलाजवळ दशक्रिया विधीसाठीच्या शेडचे काम गेली चार वर्षे रखडल्याचे मोहन वाटवे यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. कृष्णाघाट स्मशानभूमीत आधार सेवा संस्थेने रंगरंगोटी, दरवाजे, कट्टे दुरुस्ती, गीतेतील श्लोकाचे फलक, पाण्याचे नळ, निर्माल्यकुंडाची व्यवस्था केली आहे. याबद्दल आयुक्त नितीन कापडणीस यांनी संस्थेचे कौतुक केले.

फाेटाे : २९ मिरज २

Web Title: Diesel right at Miraj Krishnaghat cemetery will start

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.