कोकरुड : दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने समोरुन येणाऱ्या कारला दिलेल्या धडकेत एका परप्रांतियांचा जागीच मृत्यू झाला. इकबाल उस्मान खान (सद्या. रा. मुजावर कॉलनी कराड, मूळ झारखंड) असे मृताचे नाव आहे. कराड -शेडगेवाडी राज्य मार्गवर सय्यदवाडी (येळापुर ता. शिराळा) येथे आज, शनिवारी दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, कराड हुन शेडगेवाडीकडे कार क्रमांक (एमएच-१०-इ.इ-२००३) येत होती. तर इकबाल खान हे शेडगेवाडीहून दुचाकी क्रमांक (एमएच-५०-एफ ६८१२)वरुन कराडकडे जात होते. येळापुर पैकी सय्यदवाडी येथील एका ढाब्या समोर दोन्ही वाहने आली असता खान याचे दुचाकीवरील नियंत्रण सूटल्याने समोरुन येणाऱ्या कारला जोराची धडक झाली. धडकेत खान यांना गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच ठार झाला. अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी दाखल होत कोकरुड पोलिसानी पंचनामा केला आहे.
Sangli Accident: कार-दुचाकीच्या धडकेत एक परप्रांतीय जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 16:13 IST