मरण झाले स्वस्त; कोरोना कालावधीतही रस्ते अपघातात मृत्यूसंख्या कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:18 IST2021-06-29T04:18:56+5:302021-06-29T04:18:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यात रस्त्यांचा दर्जा सुधारत चालला असताना अपघातांची मालिकाही कायम आहे. काही भागांत रस्ते चांगले ...

Died cheap; The death toll in road accidents persisted during the Corona period | मरण झाले स्वस्त; कोरोना कालावधीतही रस्ते अपघातात मृत्यूसंख्या कायम

मरण झाले स्वस्त; कोरोना कालावधीतही रस्ते अपघातात मृत्यूसंख्या कायम

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : जिल्ह्यात रस्त्यांचा दर्जा सुधारत चालला असताना अपघातांची मालिकाही कायम आहे. काही भागांत रस्ते चांगले झाल्याने वेगाने वाहन चालवल्याने अपघात घडले तर काही भागात रस्ते खराब असल्याने अपघात घडत आहेत. कोरोनामुळे सर्वत्र निर्बंध लागू असतानाही जिल्ह्यातील अपघातांची संख्या व त्यातील मृतांची संख्या तुलनेने कायम आहे. जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत सरासरी २७५ हून अधिक जणांनी रस्ते अपघातात जीव गमावला आहे.

जिल्ह्यात वाहनांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे रस्त्याच्या परिस्थितीचा, वाहतुकीचा अंदाज न घेता वाहन चालवून अपघात घडत आहेत. यासह खराब रस्त्यांमुळेही काही भागात अपघात घडत आहेत. गेल्यावर्षी व यावर्षी पाच महिन्यांत अपघातांची संख्या कमी असली तरी त्यामुळे जखमी होणाऱ्यांचे प्रमाण कायम आहे. कोरोना अगोदर २०१७ साली ३६५ जणांचा अपघातात मृत्यू झाला होता. २०१८ साली ३५९ जणांचा मृत्यू झाला.

चौकट

लॉकडाऊनमध्ये अपघात झाले कमी; पण...

* गेल्यावर्षी कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर अनेक निर्बंध लागू करण्यात आले. त्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले होते.

* कोरोना संसर्ग कायमच राहिल्याने लॉकडाऊनही कायम राहिले होते. या कालावधीत अपघातांची संख्या कमी झाली असली तरी मृत्यूचे प्रमाण कायम राहिले आहे.

चौकट

पायी चालणाऱ्यांनाही धोका

जिल्ह्यातील अपघातात केवळ दोन वाहन अथवा एखादे वाहनांच्या अपघातांचा समावेश नसून रस्त्याकडून पायी जाणारेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यातही सकाळच्या वेळी मॉर्निंग वॉकवेळी गेलेले काही जण जखमी झाले आहेत.

चौकट

तरुणांना वेगाची नशा नडली

गेल्या तीन वर्षांतील अपघातातील मृतांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक आहे. नव्याने वाहन चालविण्याची क्रेझ आणि वेगाची नशा यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे आणि त्यात मृत्यू होण्यात व आयुष्यभरासाठी जायबंदी होणाऱ्यांत तरुणांचेच प्रमाण दुर्दैवाने अधिक आहे.

चौकट

याठिकाणी वाहने हळू चालवा

* जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीने ३६ ठिकाणी ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. वारंवार एकाच ठिकाणी अपघात होत असल्यास त्या ठिकाणास ब्लॅक स्पॉट म्हटले जाते.

* जिल्ह्यात रत्नागिरी-नागपूर, दिघंची-हेरवाड, पेठ-सांगली, विटा-सांगली या मार्गावर वाहतूक वाढली आहे. वाहनधारकांनी या मार्गावर सावकाश वाहन चालविण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

चौकट

वेळ मौल्यवान; पण जीवन अमूल्य!

कोट

रस्त्याच्या कामासाठी पसरण्यात आलेल्या खडीवरून दुचाकी घसरून अपघात घडला होता. त्यामुळे मुकामार आणि जखमाही झाल्या हाेत्या. वाहनांचा वेग कमी असल्याने अपघातातून बचावलो होतो.

-महेश ढवळे

कोट

सांगलीतील गतिरोधकांच्या उंचीचा अंदाज न आल्याने पडून जखमी झालो होतो. मात्र, त्यावेळी हेल्मेट घातले असल्याने तीव्रता जाणवली नाही व त्यामुळे बचावलो होतो. सर्वांनी हेल्मेट नेहमी वापरावे.

-दिलीप कोथळे

चौकट

वर्ष अपघात जखमी मृत्यू

२०१८ ७९७ ७०९ ३५९

२०१९ ७५६ ६६५ २९३

२०२० ५८८ ४२७ २७९

२०२१ मे पर्यंत २८६ १२६

Web Title: Died cheap; The death toll in road accidents persisted during the Corona period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.