ढवळेश्वर गाव विकासाचे मॉडेल बनेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:35 IST2021-06-09T04:35:09+5:302021-06-09T04:35:09+5:30
फोटो ओळ : ढवळेश्वर (ता. खानापूर) येथे सुहास बाबर यांच्या हस्ते ऑक्सिजन कन्व्हर्टर मशीनचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी सरपंच ...

ढवळेश्वर गाव विकासाचे मॉडेल बनेल
फोटो ओळ : ढवळेश्वर (ता. खानापूर) येथे सुहास बाबर यांच्या हस्ते ऑक्सिजन कन्व्हर्टर मशीनचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी सरपंच अनिता पाटील, उपसरपंच महादेव किर्दत, दिलीप किर्दत उपस्थित होते.
आळसंद : गावाच्या सर्वांगीण विकासासाठी गट-तट बाजूला ठेवून योग्य पद्धतीने कामे केल्यास गावाचा कायापालट होऊ शकतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ढवळेश्वर गाव आहे. आमदार अनिल बाबर, माजी सरपंच लक्ष्मण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाचे मॉडेल म्हणून पुढे येत आहे. शासनाच्या विविध योजना सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा ध्यास घेतलेले युवा कार्यकर्ते हीच ताकद असल्याचे मत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी व्यक्त केले.
ढवळेश्वर ग्राम पंचायतीच्या वतीने १४ व्या वित्त आयोगातून खरेदी केलेल्या ऑक्सिजन कन्व्हर्टर मशीनच्या लोकार्पण प्रसंगी बोलत होते. यावेळी सरपंच अनिता पाटील, उपसरपंच महादेव किर्दत, माजी उपसरपंच दिलीप किर्दत उपस्थित होते.
दिलीप किर्दत यांनी गट-तट विसरून आपल्याला कोरोनाशी लढा द्यायचा असून, आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.
राहुल मंडले यांनी स्वागत केले. ग्रामसेवक अविनाश खरमाटे यांनी आभार मानले. यावेळी देवानंद किर्दत, पप्पू कदम, शंकर किर्दत, अमोल कांबळे, अजित देशमुख, पंढरीनाथ किर्दत, जयश्री रावळ, प्रतिभा कारंडे, सुजाता सकटे उपस्थित होते.