ढवळीचे उपसरपंच अतुल पाटील यांचे आकस्मिक निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:24 IST2021-01-17T04:24:15+5:302021-01-17T04:24:15+5:30

अतुल पाटील यांचे मेडिकल दुकान आहे. ते सांगली जिल्हा केमिस्ट ॲण्ड ड्रगीस्ट असोसिएशनचे संचालक होते. एका संघटनेतर्फे आयाेजित क्रिकेट ...

Dhavali Deputy Panch Atul Patil passed away suddenly | ढवळीचे उपसरपंच अतुल पाटील यांचे आकस्मिक निधन

ढवळीचे उपसरपंच अतुल पाटील यांचे आकस्मिक निधन

अतुल पाटील यांचे मेडिकल दुकान आहे. ते सांगली जिल्हा केमिस्ट ॲण्ड ड्रगीस्ट असोसिएशनचे संचालक होते. एका संघटनेतर्फे आयाेजित क्रिकेट स्पर्धेसाठी ते शनिवारी सकाळी सहकाऱ्यांसह आटपाडी येथे गेले होते. मैदानावर खेळत असताना दुपारी तीन वाजता अचानक त्यांना छातीत तीव्र वेदना जाणवल्या. काही कळण्यापूर्वीच ते मैदानावर कोसळले. जागीच त्यांचा मृत्यू झाला.

अतुल पाटील यांची तासगाव व ढवळी येथे मेडिकल दुकाने आहेत. ते जय भवानी कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष होते. वसंतराव पाटील विद्यालय मांजर्डेचे माजी प्राचार्य व्ही.एन. पाटील यांचे ते चिरंजीव होत. अतुल पाटील सलग पाच वर्षे ढवळी गावचे उपसरपंच होते. शुक्रवारी झालेल्या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीतही गावातील विरोधकांनाही जवळ करत एकत्र निवडणूक लावली होती. ते स्वतः उमेदवार होते. अतुल पाटील यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे ढवळी गावावर शोककळा पसरली.

रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी, सहा वर्षांची मुलगी, तीन वर्षांचा मुलगा असा परिवार आहे.

फाेटाे : १६ अतुल पाटील

Web Title: Dhavali Deputy Panch Atul Patil passed away suddenly