राष्ट्रवादीच्या व्हीजेएनटी जिल्हा अध्यक्षपदी धनाजीराव जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:23 IST2021-01-02T04:23:04+5:302021-01-02T04:23:04+5:30

शिरढोण : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व्हीजीएनटी सेलच्या जिल्हाध्यक्षपदी धनाजीराव जाधव यांची निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या कवठेमहांकाळ ...

Dhanajirao Jadhav as NCP's VJNT district president | राष्ट्रवादीच्या व्हीजेएनटी जिल्हा अध्यक्षपदी धनाजीराव जाधव

राष्ट्रवादीच्या व्हीजेएनटी जिल्हा अध्यक्षपदी धनाजीराव जाधव

शिरढोण : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व्हीजीएनटी सेलच्या जिल्हाध्यक्षपदी धनाजीराव जाधव यांची निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या कवठेमहांकाळ तालुकाध्यक्षपदी संपतराव नरळे यांची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र आमदार सुमनताई पाटील यांच्या हस्ते व जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील, युवा नेते रोहित पाटील, प्रदेश उपाध्यक्ष ताजुद्दीन तांबोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत नरळे यांना देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष संजय कोळी, शहरअध्यक्ष महेश पाटील, अमर शिंदे, रमजान मुल्ला, शहर उपाध्यक्ष विशाल रसाळ, दादासाहेब नरळे‌, प्रा. अभिजित माने, मच्छिंद्र पाटील, दिग्विजय देसाई व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो : ०१ शिरढाेण १

ओळ : अंजनी (ता. तासगाव) येथे धनाजी जाधव यांना राष्ट्रवादीच्या व्हीजेएनटी जिल्हाध्यक्षपदी निवडीचे पत्र आमदार सुमनताई पाटील यांनी दिले. यावेळी ताजुद्दीन तांबोळी, महेश पाटील, संजय कोळी, आदी उपस्थित हाेते.

Web Title: Dhanajirao Jadhav as NCP's VJNT district president