ढालगाव : महिलेची गळफासाने आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:27 IST2021-05-13T04:27:50+5:302021-05-13T04:27:50+5:30
ढालगाव : ढालगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील बावीसवर्षीय महिलेने घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. तिचे ...

ढालगाव : महिलेची गळफासाने आत्महत्या
ढालगाव : ढालगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील बावीसवर्षीय महिलेने घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. तिचे सासरकडील नाव करिना तोफिक करिशाबू असे, तर माहेरकडील नाव करिना मौला पटेल, असे आहे.
करिनाचे लग्न चार वर्षांपूर्वी कर्नाटकातील अथणी तालुक्यातील तोफिक करिशाबू याच्याबरोबर झाले होते; परंतु घरगुती कारणामुळे ती पतीपासून अलिप्त होती. सध्या ती ढालगाव येथे आजी- आजोबांसोबत राहत होती.
दरम्यान, सकाळी सुमारे ११ वाजेच्या सुमारास घरी कोणी नसल्याचे पाहून तिने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कवठेमहांकाळचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दीपाली गायकवाड, मनोज पाटील, संतोष बेबडे, राजू मानवर पुढील तपास करत आहेत.