ढालगावच्या विवाहितेची आत्महत्या प्रेमसंबंधातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:26 IST2021-05-15T04:26:28+5:302021-05-15T04:26:28+5:30

ढालगाव येथील मौला पटेल यांची मुलगी करिना हिचा विवाह चार वर्षांपूर्वी कर्नाटक राज्यातील अथणी तालुक्यातील तोफिक करिशाबू यांच्याशी ...

Dhalgaon marital suicide due to love affair | ढालगावच्या विवाहितेची आत्महत्या प्रेमसंबंधातून

ढालगावच्या विवाहितेची आत्महत्या प्रेमसंबंधातून

ढालगाव येथील मौला पटेल यांची मुलगी करिना हिचा विवाह चार वर्षांपूर्वी कर्नाटक राज्यातील अथणी तालुक्यातील तोफिक करिशाबू यांच्याशी झाला होता. लग्नानंतर काही दिवसातच ती पतीपासून अलिप्त झाली होती. त्यानंतर ती ढालगाव येथे माहेरी आजी व आजोबांजवळ राहत होती. बुधवारी सकाळी आजी व आजोबा बाहेर गेले असताना घरी कोणी नसल्याचे पाहून घरी तुळईला तिने गळफास लावून घेतला होता.

कवठेमहांकाळ पोलिसांनी नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून तपासाची सूत्रे गतीने हलवली.

करिना हिचे ढालगाव येथील रोहित शिंदे याच्याशी प्रेमसंबंध होते. ‘मी तुझ्यासाठी नवऱ्याला सोडून ढालगावला आलेय. तू माझ्याशी लग्न कर’ असा करिनाने रोहितकडे आग्रह धरला होता. त्यातून झालेल्या वादावादीतून करिनाने आत्महत्या केली असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. कवठेमहांकाळ पोलिसांनी रोहितला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच गुन्हा निष्पन्न झाला. कवठेमहांकाळचे पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपाली गायकवाड अधिक तपास करत आहेत.

Web Title: Dhalgaon marital suicide due to love affair