धैर्यशील पाटील यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:31 IST2021-07-14T04:31:11+5:302021-07-14T04:31:11+5:30
संघर्ष प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सल्लागारपदी धैर्यशील पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा संघर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष अमर भडकमकर, माणिक मुळीक ...

धैर्यशील पाटील यांचा सत्कार
संघर्ष प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सल्लागारपदी धैर्यशील पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा संघर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष अमर भडकमकर, माणिक मुळीक यांनी सत्कार केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
येलूर : संघर्ष प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सल्लागारपदी येलूर (ता. वाळवा) येथील अखिल भारतीय प्राथमिक महासंघ जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष धैर्यशील पाटील यांची निवड झाली. याबद्दल त्यांचा संघर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष अमर भडकमकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
धैर्यशील पाटील म्हणाले, संघर्ष प्रतिष्ठानचे काम अत्यंत कौतुकास्पद आहे. यापुढे असेच काम प्रतिष्ठानच्यामार्फत व्हावे, सामाजिक काम करत असताना संघर्ष प्रतिष्ठानाला राजकीय स्पर्श होणार नाही. यावेळी संघर्ष प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष माणिक मुळीक, सचिव अभिजित जानकर, प्राथमिक शिक्षक राहुल पाटणे, रामचंद्र पाटील, अमोल पाटील उपस्थित होते.