ढगेवाडी सरपंचांचे बापूंना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:25 IST2021-03-20T04:25:30+5:302021-03-20T04:25:30+5:30

राजारामनगर येथे राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास सरपंच मनीषा खोत यांनी अभिवादन केले. यावेळी पी. आर. पाटील, विजयराव पाटील, ...

Dhagewadi Sarpanch greets Bapu | ढगेवाडी सरपंचांचे बापूंना अभिवादन

ढगेवाडी सरपंचांचे बापूंना अभिवादन

राजारामनगर येथे राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास सरपंच मनीषा खोत यांनी अभिवादन केले. यावेळी पी. आर. पाटील, विजयराव पाटील, आनंदराव पाटील, बाळासाहेब पवार, श्रेणिक कबाडे, माणिक शेळके उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : ढगेवाडी (ता. वाळवा) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनीषा खोत यांनी राजारामबापू कारखाना कार्यस्थळावर राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील, उपाध्यक्ष विजयराव पाटील यांनी खोत यांचे स्वागत केले. यावेळी संचालक आनंदराव पाटील, बाळासाहेब पवार, श्रेणिक कबाडे, माणिक शेळके, तसेच ग्रामपंचायत सदस्य दिलीप जाधव, मोहन सावंत, संदीप सावंत, वैभव माने, शंकर माने, विजय महाडिक, नागनाथ खोत, तुकाराम माने, किरण खोत उपस्थित होते.

Web Title: Dhagewadi Sarpanch greets Bapu