शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मिरज पश्चिम भागातून ढबू मिरची नामशेष होण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 15:34 IST

दराची अनिश्चितता, रोगराईत वाढ

सचिन ढोलेसमडोळी : बाजारपेठेतील दराची अनिश्चितता, हवामानातील बदल, निसर्गाचा असमतोल, रोगराईत वाढ, खते-औषधांचे दर व शेतमजुरीतील वाढ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस या पार्श्वभूमीवर मिरज पश्चिम भागात नगदी पैसे मिळवून देणारे ढबू मिरचीचे पीक नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.दहा-पंधरा वर्षांपूर्वी समडोळी, दुधगाव, तुंग, मौजे डिग्रज, सावळवाडी, माळवाडी भागात उत्पादित होणाऱ्या ढबू मिरचीस प्रतिकिलो ५० रुपयांपासून २०० रुपये दर मिळत होता. आवक वाढल्यास तो ३० रुपयांपासून शंभरापर्यंत खाली येत असे. तथापि अलीकडे प्रत्येक वेळेस एकच भाजीपाल्याचे पीक घेण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे पिकाच्या जमिनी नापीक बनण्याचा धोका अधिक निर्माण झाला आहे. या भागामध्ये ढबू मिरची खालोखाल टमाटे, वांगी, गवारी, भेंडी ही भाजीपाल्याची नगदी पैसा मिळवून देणारी पिकेही घेतली जातात.सध्या गुंतवणूक व मेहनतीच्या तुलनेत बाजारपेठेत अपेक्षित दर मिळत नसल्याने बहुतांशी  शेतकऱ्यांनी रोटावेटर, जेसीबी लावून भाजीपाल्याची पिके नष्ट करण्याचा सपाटा लावला आहे.ढबू मिरचीचे दर तर खूपच पडले आहेत. त्यामुळे मुंबई, पुणे, सातारा, हैदराबाद व अन्य राज्यात जाणाऱ्या ढबू मिरचीत घट झाली आहे.कर्जबाजारी होण्याची वेळकोरोनाच्या संकटात आर्थिक उलाढाल ठप्प झाली होती. पण नगदी पिके असणाऱ्या भाजीपाल्याच्या क्षेत्रात लॉकडाऊनमध्ये वाढ झाली होती. त्याचवेळी दळणवळणावर निर्बंध घातले गेल्याने नाशवंत भाजीपाला सडून गेला. त्यानंतर अवकाळी पाऊस, अतिवृष्टीचा फटका बसला. दर नसल्याने गुंतवणूक वाया गेली, परिणामी भाजीपाला उत्पादकावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी