देवराज पाटील यांचा ‘आविष्कार’च्या वतीने सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:28 IST2021-08-26T04:28:16+5:302021-08-26T04:28:16+5:30
इस्लामपूर येथे आविष्कार कल्चरल ग्रुपच्यावतीने जिल्हा नियोजन मंडळाचे नूतन सदस्य देवराज पाटील यांचा अध्यक्ष सुनील चव्हाण, प्रा. प्रदीप पाटील ...

देवराज पाटील यांचा ‘आविष्कार’च्या वतीने सत्कार
इस्लामपूर येथे आविष्कार कल्चरल ग्रुपच्यावतीने जिल्हा नियोजन मंडळाचे नूतन सदस्य देवराज पाटील यांचा अध्यक्ष सुनील चव्हाण, प्रा. प्रदीप पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सतीश पाटील, प्रा. कृष्णा मंडले, भूषण शहा, विश्वनाथ पाटसुते उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील यांना तीन पिढ्यांचा सामाजिक कार्याचा वसा आणि वारसा असून, त्यांना सामान्य माणसांच्या प्रश्नांची जाण आहे. ते जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून भरीव काम करतील, असा विश्वास महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य प्रा. प्रदीप पाटील यांनी व्यक्त केला.
आविष्कार कल्चरल ग्रुपच्यावतीने पंचायत समितीच्या सभागृहात जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल देवराज पाटील यांचा सत्कार सुनील चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आला.
पाटील म्हणाले, पालकमंत्री जयंत पाटील यांनी मला जिल्हा पातळीवर काम करण्याची संधी दिली आहे. जिल्हा नियोजन मंडळ हे जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारे मंडळ आहे. मंडळाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या प्रगतीमध्ये निश्चितपणे योगदान करू. यावेळी सतीश पाटील, भूषण शहा, विश्वनाथ पाटसुते, प्रा. कृष्णा मंडले, दाजी गावडे, विनायक कदम उपस्थित होते.