देवपुत्राच्या स्वागताचा सोहळा जल्लोषात, नाताळनिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:21 IST2020-12-26T04:21:54+5:302020-12-26T04:21:54+5:30

फोटो २५ सांगली चर्च नाताळनिमित्त सांगली चर्चमध्ये श्रद्धाळूंनी प्रार्थना व संदेशासाठी हजेरी लावली. लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : ख्रिस्ती ...

Devputra's welcome ceremony in Jallosha, a shower of good wishes for Christmas | देवपुत्राच्या स्वागताचा सोहळा जल्लोषात, नाताळनिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

देवपुत्राच्या स्वागताचा सोहळा जल्लोषात, नाताळनिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

फोटो २५ सांगली चर्च

नाताळनिमित्त सांगली चर्चमध्ये श्रद्धाळूंनी प्रार्थना व संदेशासाठी हजेरी लावली.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : ख्रिस्ती भाविकांनी नाताळचा सण उत्साहात साजरा केला. प्रार्थना आणि संदेशासाठी शहरातील विविध प्रार्थनास्थळे श्रद्धाळूंच्या गर्दीने सकाळपासूनच फुलून गेली होती. देवपुत्र येशूच्या जन्माचे स्वागत जल्लोषात करताना कोरोनाचेही पुरेपूर भान पुरेपूर राखण्यात आले.

कोरोनामुळे नाताळचा सण साधेपणानेच साजरा करण्यात आला. चर्चवर नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली होती. नाताळनिमित्त आठवडाभरापासून विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम सुरू होते. शुक्रवारी सकाळी चर्चमध्ये विशेष प्रार्थना झाल्या. जिल्हा परिषदेजवळील सांगली चर्चमध्ये पाळक टी. आर. भंडारे यांनी संदेश वाचन केले. रेव्ह. आर. एस. आवळे प्रमुख पाहुणे होते. शांतता, समृद्धी आणि कोरोनाचे निराकरण यासाठी भाविकांनी देवपुत्राकडे प्रार्थना केली.

चर्चच्या प्रांगणात येशूच्या जन्मसोहळ्याचा चित्ताकर्षक देेखावा तयार केला होता. तो पाहण्यासाठीही गर्दी होती. ख्रिस्तीबांधवांनी परस्परांना शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला. विविध कार्यक्रमांचे संयोजन युथ फेलोशिप मेंबर्स, ख्रिस्ती महिला मंडळ व चर्च व्यवस्थापन समितीने केेले.

चौकट

भक्तिभावनेला कोरोनाचेही भान

प्रार्थनास्थळांमध्ये नाताळचा जल्लोष करताना भाविकांनी कोरोनाचेही भान राखले. श्रद्धाळूंची गर्दी टाळण्यासाठी चर्च दोन सत्रांत भरविण्यात आले. सकाळी ९.३० तेे १०.३० आणि १०.३० ते ११.३० या दोन टप्प्यांत भाविक उपस्थित राहिले. प्रत्येक बेंचवर दोघांनाच बसण्याची परवानगी होती. मास्क सक्तीचा होता, तर प्रत्येकाच्या हातावर सॅनिटायजर देण्यात आले.

-----------

Web Title: Devputra's welcome ceremony in Jallosha, a shower of good wishes for Christmas