विकासाभिमुख नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:19 IST2021-07-15T04:19:25+5:302021-07-15T04:19:25+5:30

खानापूर मतदारसंघाचे आमदार म्हणून नेतृत्व करताना भाऊंनी लोककल्याणाचे व्रत हाती घेऊन विकासाचा डोंगर उभा केला. अभ्यासपूर्ण वक्तृत्व आणि सदैव ...

Developmental leadership | विकासाभिमुख नेतृत्व

विकासाभिमुख नेतृत्व

खानापूर मतदारसंघाचे आमदार म्हणून नेतृत्व करताना भाऊंनी लोककल्याणाचे व्रत हाती घेऊन विकासाचा डोंगर उभा केला. अभ्यासपूर्ण वक्तृत्व आणि सदैव मतदारसंघाच्या विकासासाठी झटणारा नेता म्हणून भाऊंची महाराष्ट्राला ओळख आहे. या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाने अर्थात भाऊंनी विटा शहरास देशपातळीवर पोहोचवले. कामाचा व्यासंग व तळमळीने भाऊंनी विकासपर्व उभे केले.

स्वच्छ विटा शहराचा विकास ही भाऊंची तळमळ आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशपातळीवर स्वच्छतेच्या लोकचळवळीस सुरुवात झाली. सन २०१८ ते २०२० सलग तीन वर्षे विटा शहराने स्वच्छतेत नाथनगरीची पताका देशपातळीवर पोहोचली. यात दूरदृष्टी होती सदाभाऊंची...!

सन २०१८ ला विटा शहराने स्वच्छतेत देशात २५ वे स्थान मिळवले. भाऊंनी स्वच्छतेच्या या लोकचळवळीत नगर परिषदेस सतत प्रोत्साहन देत शहरात स्वच्छतेची चळवळ गतिमान केली. आदरणीय भाऊ व मा. नगराध्यक्ष तथा स्वच्छतेचे ब्रॅण्ड ॲम्बेसिडर ॲड. वैभवदादा पाटील यांनी अहोरात्र प्रयत्न केले. लोकांचा सहभाग वाढवला, विटा शहर कचरामुक्त शहर केले. लोकांच्या सवयीमध्ये बदल केला. लोकांनीही सक्रिय योगदान देत शहराच्या स्वच्छतेत भर घातली. भाऊंनी विटा शहराचा चेहरामोहरा बदलला आणि देशपातळीवर पश्चिम भारतात सर्वाधिक स्वच्छ शहर म्हणून प्रथम तर देशात चौथा क्रमांक विटा शहरास मिळाला. विटेकरांच्या साथीने व भाऊंच्या दूरदृष्टीने हा नावलौकिक मिळाला.

खानापूर मतदारसंघाच्या विकासासाठी नेहमी अग्रेसर असणारे, शेती, औद्योगिक, सहकार, शिक्षण, सांस्कृतिक, पर्यावरण, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत भरीव योगदान असणारे व मतदारसंघाचा कायापालट करणारे धुरंधर नेतृत्व म्हणून भाऊंचा नावलौकिक सदैव आहे. कोरोनाच्या महामारीत लोकांना धीर देत सढळ हाताने मदतीचा ओघ दिला. मतदारसंघातील विविध प्रश्न सोडवणारे भाऊ या मतदारसंघातील प्रत्येक माणसाच्या पाठीशी संकटकाळात ठाम उभे राहिले.

माजी आमदार भाऊ यांनी खानापूर मतदारसंघातील सोने-चांदी उद्योजकांना मोठा आधार दिला आहे. त्यांच्या व्यवसायाची ते सातत्याने विचारपूस करतात. तसेच स्थानिक प्रश्न सोडविण्यास भाऊ नेहमीच प्राधान्य देत आहेत.

विटा न्यायालयाची टोलेजंग इमारत निर्माण करून उपजिल्हा न्यायालयाला मंजुरी मिळवून घेतली आहे. त्यामुळे या उपजिल्हा न्यायालयात आता खानापूर, आटपाडी, कडेगाव व पलूस या चार तालुक्यांतील कामकाज चालणार असल्याने पक्षकारांना सांगली न्यायालयात जाण्याचा त्रास बंद झाला आहे. खानापूर मतदारसंघाचा विकास साधताना माजी आ. सदाभाऊंनी अत्यंत दूरदृष्टी ठेवून कामे केली आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना सदाभाऊ आपलेसे वाटत आहे.

सामान्य माणसाशी नाळ आणि स्वच्छ राजकारणाची प्रतिमा अशी अतूट ओळख असलेले खानापूर मतदारसंघाचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य मा. ॲड. सदाशिवराव (भाऊ) पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!

-अशोकराव मोरे, लेंगरे

उद्योजक, पुणे

Web Title: Developmental leadership

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.