आष्टा शहरातील विकासकामे मार्गी लावणार : वैभव शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:49 IST2021-03-13T04:49:19+5:302021-03-13T04:49:19+5:30
ओळ : आष्टा येथील विविध विकास कामांचे उद्घाटन वैभव शिंदे, झुंजारराव पाटील, विशाल शिंदे, स्नेहा माळी, प्रतिभा पेटारे, नारायण ...

आष्टा शहरातील विकासकामे मार्गी लावणार : वैभव शिंदे
ओळ :
आष्टा येथील विविध विकास कामांचे उद्घाटन वैभव शिंदे, झुंजारराव पाटील, विशाल शिंदे, स्नेहा माळी, प्रतिभा पेटारे, नारायण वायदंडे, संगीता घस्ते यांच्याहस्ते झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : आष्टा शहरात माजी आमदार विलासराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामे झाली आहेत, उर्वरित विकास कामे आष्टा नगरपालिकेच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येतील, असे प्रतिपादन आष्टा शहर विकास आघाडीचे नेते वैभव शिंदे यांनी केले.
आष्टा येथील अण्णा भाऊ साठे हौसिंग सोसायटीमध्ये नवीन गटारीचे काम तसेच साठेनगर येथील लक्ष्मी मंदिरसमोर पेव्हिंग ब्लॉक बसविण्याच्या कामाच्या उद्घाटनप्रसंगी वैभव शिंदे बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा स्नेहा माळी, उपनगराध्यक्षा प्रतिभा पेटारे, विशाल शिंदे, झुंजारराव पाटील, धैर्यशील शिंदे, सतीश माळी, नारायण वायदंडे, संकेत पाटील, प्रकाश घस्ते, रुक्मिणी अवघडे, संगीता घस्ते, चंद्रकांत घस्ते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.