कासेगाव येथे विकासकामे सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:18 IST2021-06-10T04:18:35+5:302021-06-10T04:18:35+5:30
कासेगाव येथे दलित वस्तीमध्ये क्रॉँक्रिटीकरण गतीने सुरू आहे. लोकमत न्यूज नेटवर्क कासेगाव : कासेगाव (ता. वाळवा) येथे दलित वस्ती ...

कासेगाव येथे विकासकामे सुरू
कासेगाव येथे दलित वस्तीमध्ये क्रॉँक्रिटीकरण गतीने सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कासेगाव : कासेगाव (ता. वाळवा) येथे दलित वस्ती सुधार निधी व जि. प. सदस्या संगीता पाटील यांच्या फंडातून मातंग समाजात ८ लाखांची विकासकामे सुरू आहेत. यामध्ये कॉँक्रिटीकरण, गटारी बांधणे, पाइप टाकून चेंबर बांधणे आदी कामे सुरू आहेत. याच भागात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील यांच्या प्रयत्नातून आणखी १२ लाखांची कामे मंजूर झाली आहेत. यामध्ये दफनभूमी ते हणमंत मिसाळ यांच्या घरापर्यंत आरसीसी गटार बांधणे, साठे गल्लीमध्ये पेव्हिंग ब्लॉक बसवणे व इतर दोन ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक व कॉँक्रिटीकरण करणे आदी कामे प्रस्तावित आहेत. ही कामे येत्या महिनाभरात सुरू होतील, अशी माहिती सरपंच किरण पाटील यांनी दिली.