आष्टा शहरातील विकासकामे मार्गी लावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:22 IST2020-12-26T04:22:05+5:302020-12-26T04:22:05+5:30

आष्टा : आष्टा शहरातील जनतेने विकासाला साथ दिली आहे. शहरातील रस्ते, वीज, पाणीपुरवठा यासह घरकुलाचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात ...

Development work in Ashta city will be arranged | आष्टा शहरातील विकासकामे मार्गी लावणार

आष्टा शहरातील विकासकामे मार्गी लावणार

आष्टा : आष्टा शहरातील जनतेने विकासाला साथ दिली आहे. शहरातील रस्ते, वीज, पाणीपुरवठा यासह घरकुलाचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात येतील, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.

आष्टा शहरातील बसुगडे चौक, नगरसेवक अंकुश मदने घर व आष्टा पीपल बँकेचे संचालक बबन थोटे यांच्या घरासमोर शहरातील विविध प्रश्नांबाबत मंत्री जयंत पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधला.

जयंत पाटील म्हणाले, जिल्ह्यातील धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन आपल्या दारी ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. सर्व अधिकारी धरणग्रस्तांच्या समस्या जागेवर जाऊन सोडवतील. १२ जानेवारीपर्यंत प्रश्न मार्गी लागतील. त्यातूनही काही प्रश्न राहिल्यास लवकर मार्ग काढण्यात येईल.

झुंझारराव पाटील, तेजश्री बोंडे, जगन्नाथ बसुगडे यांनी मनोगत व्यक्त केले. बुथ अध्यक्ष प्रताप तांबवेकर, संदीप बसुगडे, उदय कुशिरे, मुबारक कावणकर, अंकुश मदने, प्रसन्न शिंदे, महेश पाटील, पंकज माळी, प्रीतम मालगावे यांनी भागातील समस्या सोडण्याची मागणी केली.

यावेळी युवक नेते प्रतीक पाटील, दिलीप वग्यांणी, बबन थोटे, संग्राम फडतरे, रघुनाथ जाधव, नगराध्यक्षा स्नेहा माळी, विराज शिंदे, माणिक शेळके, संग्राम पाटील, प्रकाश रुकडे, मुख्याधिकारी कैलास चव्हाण, नायब तहसीलदार दिक्षात देशपांडे उपस्थित होते.

फोटो ओळी- २५१२२०२०-आयएसएलएम-आष्टा जयंत पाटील संवाद न्यूज

फोटो ओळ : आष्टा येथे संपर्क बैठकीत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रतीक पाटील, झुंझारराव पाटील, दिलीप वग्यांणी, स्नेहा माळी, तेजश्री बोंडे, विराज शिंदे, संग्राम फडतरे, रघुनाथ जाधव, धैर्यशील शिंदे, अनिल पाटील, संजय पाटील, भानुदास निंभोरे व मान्यवर.

Web Title: Development work in Ashta city will be arranged