मिरज तालुक्याचे विकसाभिमुक नेतृत्व!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:25 IST2021-05-17T04:25:00+5:302021-05-17T04:25:00+5:30
महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात सांगलीचा नेहमीच दबदबा राहिला आहे. यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण, राजारामबापू पाटील, आबासाहेब शिंदे-म्हैसाळकर, माजी ...

मिरज तालुक्याचे विकसाभिमुक नेतृत्व!
महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात सांगलीचा नेहमीच दबदबा राहिला आहे. यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण, राजारामबापू पाटील, आबासाहेब शिंदे-म्हैसाळकर, माजी आमदार मोहनराव शिंदे-म्हैसाळकर हे थोर नेते होऊन गेले. यामध्ये जिल्ह्यातील राजकारणात म्हैसाळकर-शिंदे कुटुंबाचा सिंहाचा वाटा राहिला आहे. याच कुटुंबातील मोहनराव शिंदे-म्हैसाळकर व श्रीमती पद्मिनीदेवी शिंदे-म्हैसाळकर यांच्या पोटी मनोजबाबा यांचा जन्म झाला.
मिरज तालुक्याचे जनक, गोरगरिबांचे कैवारी, माजी आमदार मोहनराव शिंदे-म्हैसाळकर यांच्या निधनानंतर वरिष्ठ नेत्यांच्या पाठिंब्यामुळे व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मनोजबाबा यांनी समाजकारण व राजकारणाला सुरुवात केली. संघटन कौशल्य, जिद्द, चिकाटी, संयम या गुणांमुळे मनोजबाबा सर्व कार्यकर्त्यांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.
समाजकारण व राजकारण करण्यासाठी नेहमीच त्यांच्या मातोश्री श्रीमती पद्मिनीदेवी शिंदे-म्हैसाळकर (आईसाहेब) यांचे व महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंतराव पाटील यांचे मार्गदर्शन लाभते.
दुष्काळी भागात संजीवनी ठरणाऱ्या म्हैसाळ पाणी योजनेचे पाणी शेतकऱ्यांना मिळावे म्हणून मनोजबाबा हे नेहमी पुढाकर घेतात. मिरज पूर्व भाग असेल कवठेमहांकळ, जत या तालुक्यात उन्हाची दाहकता वाढल्याने मार्च महिन्यात शेतकऱ्यांच्या शेतातील विहीर व कूपनलिकांच्या पाणी पातळीत दिवसेंदिवस घट होत होती. त्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावे, शेतकऱ्यांचे शेतातील उत्पन्न वाढावे व शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती व्हावी हा मनोजबाबांचा प्रयत्न असतो.
याचसाठी मार्च २०२१ मध्ये उन्हाळ्यात मिरज पूर्व भागातील शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता भासत होती. यामुळे शेतकऱ्यांनी एकत्र येत गावागावांमध्ये बैठक घेऊन शेतीला पाणी मिळाले पाहिजे अशी भूमिक मनोजबाबा यांच्याकडे मांडली. बाबांनी ही शेतकऱ्यांची मागणी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे मांडली. तत्काळ मार्च महिन्यात ही योजना सुरू करून देऊन शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर क्षेत्राला पाणी मिळवून दिले.
मिरज तालुक्याची राष्ट्रवादी काँग्रेसची जबाबदारी मनोजबाबांच्या खांद्यावर असल्याने गेल्या वर्षापासून राष्ट्रवादी मिरज तालुक्यात बळकट करण्यासाठी मनोजबाबांनी पक्ष प्रवेशांचा झंझावात सुरू ठेवला आहे. मनोजबाबांचे नेतृत्व मानत तालुक्यातील असंख्य कर्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. ते सर्व कार्यकर्ते आज पक्ष बळकट करण्यासाठी ग्रामीण व शहरी भागात उत्तम काम करीत आहेत.
मोहनराव शिंदे-म्हैसाळकर यांनी केंद्र सरकारकडून मंजूर करून घेतलेला साखर करखाना जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या सहकार्यातून मनोजबाबा यांनी जिद्दीने सुरू ठेवला आहे.
गेल्या दहा वर्षांत मनोजबाबांच्या नेतृत्वाखाली म्हैसाळच्या माजी सरपंच सौ. मनोरमादेवी शिंदे-म्हैसाळकर यांनी अनेक विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. त्या नेहमी सर्वसामान्य लोकांची कामे करण्यासाठी पुढाकर घेतात. मनोजबाबांच्या मार्गदर्शनानुसार सौ. मनोरमादेवी शिंदे-म्हैसाळकर यांनी महिलांच्या हाताला रोजगार मिळावा म्हणून महिलांसाठी श्री महिला गृहउद्योग (लिज्जत पापड) केंद्र सुरू केले. या केंद्राच्या माध्यमातून आज जवळपास १५० महिलांच्या हाताला काम मिळाले आहे. मनोजबाबा शिंदे-म्हैसाळकर यांच्या नेतृत्वाखाली मोहनराव शिंदे सहकारी दूध संघ, आबासाहेब शिंदे दूध उत्पादक व पुरवठा सोसायटी, मोहनराव शिंदे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, कवलापूर येथील गणेश बिगरशेती पतसंस्था या संस्था कार्यरत असून त्या प्रगतीपथावर आहेत.
बाबांच्या चेहऱ्यावर नेहमी स्मितहास्य असते, कितीही संकटे आली तरी ते कधी डगमगले नाहीत व कोणासमोर झुकलेही नाहीत. असे त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या पत्नी मनोरमादेवी शिंदे-म्हैसाळकर व बंधू परेशबाबा शिंदे-म्हैसाळकर हे म्हैसाळच्या राजकरणात सक्रिय असतात. तर बाबांचे चिरंजीव शालिवाहन शिंदे-म्हैसाळकर हे युवकांच्या सुखदु:खात सहभागी असतात. मनोजबाबांच्या पत्नी सौ. मनोरमादेवी शिंदे-म्हैसाळकर यांनी गावातील त्यांच्या हातात असणाऱ्या सर्व सहकरी संस्थांची जबाबदारी उचलून त्या संस्था उत्तम रीतीने चालवतात ही अभिमानाचीच गोष्ट म्हणावी लागेल.
यापुढील काळातही मनोजबाबांच्या हातून गोरगरीब जनतेची सेवा होऊ दे! त्यांना येणारे वर्ष समृध्दी, आनंदी, भरभराटीचे, आरोग्यसंपन्न व राजकीयदृष्ट्या उत्तम जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना करून त्यांचे वाढदिनी अभीष्टचिंतन करतो.
शब्दांकन : सुशांत घोरपडे
चाैकट
नागरिकांना आवाहन
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने या वर्षी मनोजबाबा शिंदे-म्हैसाळकर हे वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारणार नाहीत. नागरिकांनी मास्कचा वापरा करावा. तसेच घरी राहून, सुरक्षित राहुन शासनाच्या नियमांचे पालन करावे. असे आवाहन करण्यात आले आहे.