कुकटाेळीतील जुना पन्हाळागडाचा विकास करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:26 IST2021-05-11T04:26:55+5:302021-05-11T04:26:55+5:30

ओळ : कुकटाेळी (ता. कवठेमहांकाळ) येथे जुना पन्हाळा किल्ला पर्यटनस्थळ करावा यासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांना संजय हजारे, बाळ ...

Develop the old Panhalagad in Kukatali | कुकटाेळीतील जुना पन्हाळागडाचा विकास करा

कुकटाेळीतील जुना पन्हाळागडाचा विकास करा

ओळ : कुकटाेळी (ता. कवठेमहांकाळ) येथे जुना पन्हाळा किल्ला पर्यटनस्थळ करावा यासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांना संजय हजारे, बाळ महाराज यांच्यासह ग्रामस्थांनी निवेदन दिले.

कवठेमहांकाळ : कुकटोळी (ता. कवठेमहांकाळ) येथील जुना पन्हाळागडाचा विकास करा, तसेच पर्यटन क्षेत्र विकसित करा, अशी मागणी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे कुकटोळी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी केली आहे.

रविवारी पालकमंत्री पाटील यांनी जुना पन्हाळागडाला भेट दिली. यावेळी मागण्यांचे निवेदन काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय हजारे, बाळ महाराज व ग्रामस्थांनी पाटील यांना दिले.

जुना पन्हाळा हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ला आहे. या ठिकाणी शिवाजी महाराजांंनी किल्ला बांधणीसाठी खुदाई केलेली होती. त्यांची आठवण म्हणून हे ठिकाण पर्यटन क्षेत्र करण्यात यावे. कुकटोळीपासून डोंगरावरील शिवमंदिरापर्यंत डांबरी रस्ता करण्यात यावा. मंदिराच्या परिसरात संरक्षक भिंत बांधण्यात यावी. पठारावर पर्यटनस्थळ करण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, माजी सभापती दत्ताजीराव पाटील, राष्ट्रवादीचे सरचिटणीस बाळासाहेब पाटील, दीपक शिंदे, शिवाजी कारंडे, तानाजी यमगर, प्रशांत घुळी, प्रकाश पाटील, पवन एडके, नंदकुमार एडगे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Develop the old Panhalagad in Kukatali