जत दरोड्यातील संशयितांना कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:24 IST2021-01-18T04:24:04+5:302021-01-18T04:24:04+5:30
जत : जतजवळ सराफ व्यापाऱ्याकडून अडीच कोटी रुपयांचे सोने लुटणाऱ्या पाच संशयित आरोपींना जत येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ...

जत दरोड्यातील संशयितांना कोठडी
जत : जतजवळ सराफ व्यापाऱ्याकडून अडीच कोटी रुपयांचे सोने लुटणाऱ्या पाच संशयित आरोपींना जत येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर उभे केले असता त्यांना २१ जानेवारी अखेरपर्यंत पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यांच्याकडून सातारा, कराड व सांगली येथील आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
प्रवीण उत्तम चव्हाण (वय २७), विजय बाळासाहेब नागरे (२७, दोघे रा. यप्पावाडी, ता. आटपाडी), विशाल बाळू कारंडे (२७, रा. गोरेगाव, ता. खटाव), तात्यासाहेब शेट्टीबा गुसाळे (३६, रा. मरडवाघ, ता. खटाव), वैभव साहेबराव माने (३२, रा. भोसरे, ता. खटाव) या पाच जणांना अटक केली आहे. यापैकी विजय नागरे, तात्यासाहेब गुसाळे, वैभव माने हे सराईत अट्टल गुन्हेगार असून त्यांच्या विरोधात सातारा, कराड व सांगली पोलिसात दरोड्याचे गुन्हे यापूर्वी दाखल झाले आहेत.
चौकट
मोठ्या उलाढालीने संशय
बाळासाहेब सावंत हे एका महिन्यात तीन ते चार वेळा संजय नलवडे (रा. शेगाव, ता. जत) यांना सोने देत होते. दुष्काळी तालुक्यातील एका छोट्या गावातून इतक्या मोठ्या प्रमाणात सोन्याची उलाढाल होत असल्याचे या घटनेमुळे उघडकीस आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.