बोरगावात दारूअड्डा उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:28 IST2021-05-06T04:28:39+5:302021-05-06T04:28:39+5:30

बोरगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील दारूअड्ड्यावर कवठेमहांकाळ पोलिसांनी छापा टाकून साठा उद्ध्वस्त केला. गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोरगाव हद्दीत ...

Destroyed liquor store in Borgaon | बोरगावात दारूअड्डा उद्ध्वस्त

बोरगावात दारूअड्डा उद्ध्वस्त

बोरगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील दारूअड्ड्यावर कवठेमहांकाळ पोलिसांनी छापा टाकून साठा उद्ध्वस्त केला. गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोरगाव हद्दीत अवैध देशी दारू काढत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार छापा टाकला. तेथे सागर अनिल बुधाले (वय २१), राहुल राजाराम चव्हाण (२९, रा. करोली (एम.) ता. मिरज) दारू काढत असल्याचे दिसून आले. तेथील ९६०० रुपये किमतीची अवैध दारू आणि मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

कवठेमहांकाळचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी तालुक्यात अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील आनंदराव जाधव व देवानंद बोबडे यांनी ही कारवाई केली आहे.

फोटो ओळी : बोरगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील अवैध दारू साठा उद्ध्वस्त केला.

Web Title: Destroyed liquor store in Borgaon