शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधानंतरही 'शक्तिपीठ महामार्गा'च्या भूसंपादनाची अधिसूचना जाहीर

By संतोष भिसे | Updated: June 12, 2024 11:52 IST

आक्षेपांवर सुनावणी नाही

संतोष भिसे

सांगली : राज्यभरातील शेतकऱ्यांच्या प्रचंड विरोधानंतरही शासनाने शक्तिपीठ महामार्ग रेटून नेण्याचे ठरविल्याचे स्पष्ट झाले आहे. महामार्गासाठी भूसंपादनाची अधिसूचना मंगळवारी जाहीर करण्यात आली. त्यावर २१ दिवसांपर्यंत हरकती घेता येणार आहेत.सांगली जिल्ह्यात संपादित केल्या जाणाऱ्या जमिनीची माहिती अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे. त्यानुसार कवठेमहांकाळ तालुक्यात घाटनांद्रे, तिसंगी, तासगाव तालुक्यात डोंगरसोनी, सिद्धेवाडी, सावळज, अंजनी, वज्रचौंडे, गव्हाण, मणेराजुरी, मतकुणकी, नागाव कवठे, मिरज तालुक्यात कवलापूर, बुधगाव, कर्नाळ, पद्माळे, सांगलीवाडी येथील शेतजमिनी संपादित केल्या जाणार आहेत. पवनार ते पत्रादेवी (नागपूर - गोवा) महाराष्ट्र शक्तिपीठ द्रुतगती महामार्गासाठी या गावांतील जमिनी संपादित करण्यात येत असल्याचे शासनाच्या उपसचिव दीपाली नाईक यांनी अधिसूचनेत म्हटले आहे.याबाबत आक्षेप असतील, तर मिरजेचे प्रांताधिकारी तथा भूसंपादन अधिकारी यांच्याकडे दाखल करावेत, असेही आवाहन केले आहे. यापूर्वी आक्षेप दाखल केलेल्या किंवा ज्यांच्या आक्षेपांवर सुनावणी झाली आहे, अशा शेतकऱ्यांना पुन्हा आक्षेप दाखल करता येणार नाहीत.दरम्यान, शक्तिपीठ महामार्गात जिल्ह्यातील शेकडो एकर बागायत शेतजमीन जाणार असल्याने शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी कमी मूल्यांकनाच्या कारणास्तव विरोध केला आहे. पण, शासनाने या विरोधाला न जुमानता भूसंपादनाची अधिसूचना काढल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. याच पद्धतीने आता कोल्हापूर व रत्नागिरी जिल्ह्यांतही अधिसूचना निघणार आहे.

आक्षेपांवर सुनावणी नाहीदरम्यान, शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनासंदर्भात मिरजेच्या प्रांताधिकाऱ्यांकडे यापूर्वीच अडीच हजारांवर आक्षेप दाखल झाले आहेत. मात्र, त्यावर अद्याप सुनावणी झालेली नाही. हा महामार्ग आवश्यक नसल्याने रद्द करावा, अशी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची मागणी आहे.

संपादित केली जाणारी गावनिहाय गटसंख्या अशीघाटनांद्रे १०८, तिसंगी ४९, डोंगरसोनी ६६, सावळज २४, सिद्धेवाडी ४, अंजनी ६९, वज्रचौंडे ५१, गव्हाण १२, मणेराजुरी १५८, मतकुणकी ४२, नागाव कवठे १२६, कवलापूर १६९, बुधगाव ८४, कर्नाळ ७६, पद्माळे ६१, सांगलीवाडी ६३.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरhighwayमहामार्ग