विराटसारखे मॅचविनर होण्याची इच्छा

By Admin | Updated: May 18, 2016 00:15 IST2016-05-17T23:57:37+5:302016-05-18T00:15:11+5:30

स्मृती मानधना : इंजिनिअर्स आर्किटेक्ट असोसिएशनतर्फे सत्कार

The desire to become a matchwinner like Virat | विराटसारखे मॅचविनर होण्याची इच्छा

विराटसारखे मॅचविनर होण्याची इच्छा

सांगली : विराट कोहली आक्रमक आहे. माझीही खेळण्याची शैली तशीच आहे. तो भारताला मोठ्या प्रमाणात सामने जिंकून देतो. मलाही त्याच्यासारखं खेळून भारताला सामने जिंंकून देण्याची इच्छा आहे, असे मनोगत भारताची आघाडीची फलंदाज स्मृती मानधना हिने व्यक्त केले. इंजिनिअर्स अँड आर्किटेक्ट असोसिएशनच्यावतीने स्मृतीचा राज्याचे क्रीडा सहसंचालक नरेंद्र सोपल यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला, यावेळी स्मृती मानधना बोलत होती. स्मृती म्हणाली, घरात भावाकडून क्रिकेटचे धडे घेतले. आई वडिलांनी पाठिंबा आणि प्रोत्साहन दिले. त्यामुळेच खरेतर इथवर पोहोचले. बांगलादेशविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण करताना नर्व्हस होते. मात्र नंतर चांगलेच सरावले. आॅस्ट्रेलियाविरुद्ध १०२ धावांची खेळी केली. मात्र आपण अखेरपर्यंत न खेळल्याने संघाला पराभव पत्करावा लागला ही खंत राहिल्याचे ती म्हणाली. ही मुलाखत केदार टाकवे यांनी घेतली. यावेळी अनेक प्रश्नांना तिने मोकळेपणाने उत्तर दिले. स्वागत असोसिएशनचे अध्यक्ष सुहास जनाज यांनी केले. सचिव प्रमोद शिंंदे यांनी आभार मानले. यावेळी असोसिएशनचे ट्रस्टी जयवंत परीख, एस. पी. तायवाडे-पाटील, माजी उपमहापौर प्रशांत पाटील मजलेकर, कुमार मेहता, मुकुल परीख, प्रमोद चौगुले तसेच माजी अध्यक्ष प्रमोद परीख, उपाध्यक्ष रणदीप मोरे, जितेंद्र कोळसे, वाय. के. पाटील, पंजाब मोरे आदींसह असोसिएशनचे सर्व संचालक, मानधना परिवार, पदाधिकारी, क्रीडाक्षेत्रातील मान्यवर व खेळाडू उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: The desire to become a matchwinner like Virat