भाजपची ताकद देशमुखांच्या पाठीशी
By Admin | Updated: October 25, 2015 23:33 IST2015-10-25T22:46:14+5:302015-10-25T23:33:58+5:30
राम शिंदे : कडेपूरमध्ये सत्कार, विकासकामांसाठी सहकार्याची ग्वाही

भाजपची ताकद देशमुखांच्या पाठीशी
कडेगाव : भारतीय जनता पक्षाची केंद्र व राज्य शासनाची सर्व ताकद पृथ्वीराज देशमुख यांच्या पाठीशी उभी करू. पक्ष विकास कामासाठी सर्व ती मदत करेल, असे प्रतिपादन राज्याचे गृह राज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.
प्रा. राम शिंदे यांचा सत्कार समारंभ शनिवारी कडेपूर येथे आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते.
शिंदे म्हणाले की, सर्व पातळीवर शासन यशस्वी होत आहे. पृथ्वीराज देशमुख यांनी ठिबक सिंचनाचा प्रकल्प उभा करून शेती विकासाचे हे मॉडेल पायाभूत मानून मोठ्या प्रमाणावर राज्यभर राबविणे आवश्यक आहे. कडेपूरचे ग्रामदैवत श्रीक्षेत्र डोंगराईदेवी हे पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी सर्व ती मदत करू.
शिंदे यांचा सत्कार सांगली बँकेचे उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्याहस्ते करण्यात आला. कडेपूर ग्रामपंचायतीच्यावतीने सरपंच शिवाजी लोहार व उपसरपंच अनिल यादव यांनी सत्कार केला. जिल्हाध्यक्ष राजाराम गरूड, लालासाहेब यादव यांनी मनोगत व्यक्त केले.
माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गोसावी, कडेगाव उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार हेमंत निकम, बंडोपंत राजोपाध्ये दादासाहेब कांबळे, तहसीलदार हेमंत निकम, बंडोपंत राजोपाध्ये, सतीश देशमुख, जयदीप देशमुख, धनंजय देशमुख, दत्तात्रय सूर्यवंशी, युवराज सावंत, महालक्ष्मी सूतगिरणीचे अध्यक्ष मनोहर सकट, उपाध्यक्ष रवींद्र कांबळे, तानाजी जाधव उपस्थित होते. नथुराम पवार यांनी आभार मानले. (वार्ताहर)