शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
2
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
3
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
4
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
5
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
6
भयंकर! भाजपा नेत्याने पत्नीच्या हत्येचा कट रचला, काटा काढला, नंतर स्वत:वरच केला हल्ला, अखेर...
7
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?
8
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
9
फक्त १०,००० रुपये गुंतवून जमा होईल ३ कोटी रुपयांचा फंड! १०:१२:३० चा फॉर्म्युला असा करतो काम
10
कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...
11
भाजपा नेत्यासमोरच पत्नीची हत्या, धारदार हत्याराने चिरला गळा, दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेमुळे खळबळ  
12
Festival: तिथीवरून वर्षभराचे सण आणि महिने कसे लक्षात ठेवायचे ते शिका आणि मुलांनाही शिकवा!
13
पगारवाढीचा 'T' फॅक्टर! TOR म्हणजे काय? ज्याशिवाय ८ वा वेतन आयोग लागू होणार नाही, लगेच जाणून घ्या!
14
असित मोदींनी 'दयाबेन'सोबत साजरा केला रक्षाबंधनाचा सण, दिशा वकानीबद्दल म्हणाले...
15
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
16
'निमिषा प्रियाला अजिबात माफ केले जाणार नाही, तिला ताबडतोब फाशी द्या', तलालच्या भावाने तिसऱ्यांदा दाखल केली याचिका
17
Tarot Card: ध्येयपूर्तीकडे वाटचाल करायला लावणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
18
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी
19
पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई
20
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!

बहुरंगी लढतीत दिसणार कदम-देशमुखांचा संघर्ष

By admin | Updated: July 1, 2016 23:35 IST

पलूस - नगरपालिकांचे संभाव्य चित्र

किरण सावंत--  पलूस --नव्यानेच स्थापन झालेल्या नगरपरिषदेमुळे पलूस शहराच्या विकासाला गती येणार आहे. नोव्हेंबर २०१६ मध्ये नगरपरिषदेची पहिली निवडणूक अपेक्षित असली तरी या पहिल्याच निवडणुकीत सत्ता काबीज करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपच्या नेतेमंडळींनी आतापासूनच तयारी चालविली आहे. पलूस ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे तत्कालीन नेते जिल्हा परिषदेचे माजी सभापती बापूसाहेब येसुगडे व अमरसिंह इनामदार यांनी स्थापन केलेल्या स्वाभिमानी विकास आघाडीने काँग्रेसचा पराभव करून सत्ता हस्तगत केली होती. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत दोघांनीही भाजपचा प्रचार केला. यामुळे यापुढील काळात त्यांच्या आघाडीला कितपत प्रतिसाद मिळेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी पलूस शहराच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. पलूसची यशवंत पाणीपुरवठा संस्था सुरू केल्याने शहराच्या अर्थकारणाला गती मिळाली आहे. ज्येष्ठ नेते वसंतराव पुदाले, सुहास पुदाले, पंचायत समितीचे उपसभापती सुहास पुदाले, माजी समाजकल्याण सभापती खाशाबा दळवी, विक्रम पाटील, गिरीश गोंदिल यांनीही शहराच्या विकासात सक्रिय हातभार लावला आहे. यामुळे पलूसमधील मतदार हा काँग्रेसच्याच पाठीशी राहणार, या ठाम विश्वासातून काँग्रेसची नेतेमंडळी नगरपरिषदेत पहिली सत्ता आपलीच असली पाहिजे, या ईर्षेने तयारीला लागली आहेत. याउलट राज्यात आणि देशात असलेल्या भाजपच्या सत्तेचे मार्केटिंग करीत स्थानिक पातळीवरही पलूस नगरपरिषदेत आपलीच सत्ता कायम करण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बापूसाहेब येसुगडे, अमरसिंह फडनाईक यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी चंग बांधला आहे.पृथ्वीराज देशमुख राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर सध्या राष्ट्रवादीची ताकद मर्यादित राहिली आहे. क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरूण लाड वगळता सक्षम नेतृत्व राष्ट्रवादीकडे नाही. तालुकाध्यक्ष मारूती चव्हाण कार्यकर्त्यांची बांधणी करीत असले तरी राष्ट्रवादी स्वबळावर लढणार, की काँग्रेसबरोबर आघाडी करणार, याबाबत पक्ष देईल तो निर्णय विीकारणार असल्याचे सांगत आहेत. सध्या काँग्रेस, राष्ट्रवादीची नेतेमंडळी कार्यकर्त्यांचे मेळावे घेऊन वातावरण निर्मिती करीत आहेत. पक्षाच्या चिन्हावरच निवडणूक लढविणार, हे कार्यकर्त्यांमध्ये बिंबविले जात आहे. या साऱ्या रणधुमाळीत शिवसेनेचे लालासाहेब गोंदिल, प्रशांत लेंगरे, शेतकरी संघटनेचे पोपटराव भोरे यांनीही निवडणुकीची तयारी चालविली आहे. यामुळे बहुरंगी ठरणाऱ्या या निवडणुकीत पलूस-कडेगाव मतदार संघातील कदम-देशमुख संघर्षाचेच प्रतिबिंब नगरपरिषदेत उमटणार, हे स्पष्ट आहे. पहिल्या नगराध्यक्षाचा मान कोणाला?नगराध्यक्ष निवड थेट जनतेतून करण्याच्या शासनाच्या निर्णयाची पलूस नगरपरिषद निवडणुकीत अंमलबजावणी होणार आहे. प्रभाग आरक्षण, नगराध्यक्ष पदाचे आरक्षण, सत्तेचा कौल, अशा अनेक बाबी अद्याप स्पष्ट झालेल्या नाहीत. यामुळे शहराचा पहिला नगराध्यक्ष होण्याचा मान कोणाला मिळणार, याची कमालीची उत्सुकता असणार आहे. पलूस-कडेगाव मतदारसंघाचा वाढता विस्तार लक्षात घेऊन १६ मार्च २०१६ रोजी पलूस नगरपरिषदेची स्थापना करण्यात आली. शहराची वाढती लोकसंख्या, विस्तार पाहता शहरीकरण आणि विकास कामांना ग्रामपंचायतीमुळे मर्यादा येत होत्या. आता नगरपरिषदेच्या स्थापनेमुळे शहराचा नियोजनपूर्वक विकास व विस्तार करणे शक्य होणार आहे. नव्यानेच स्थापन झालेल्या नगरपरिषदेचा निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर होणार असून सध्या प्रशासक म्हणून तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्याकडे नगरपरिषदेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.कदम-देशमुख संघर्षनगरपरिषदेची स्थापना झाल्यानंतर तत्कालीन ग्रामपंचायतीची सत्ता संपुष्टात येऊन प्रशासन नेमण्यात आले. ग्रामपंचायतीवर बापूसाहेब येसुगडे व अमरसिंह इनामदारप्रणित स्वाभिमानी विकास आघाडीची सत्ता होती. एकूण १७ सदस्यांपैकी ११ सदस्य स्वाभिमानी संघटनेचे, तर विरोधी काँग्रेसचे ६ सदस्य होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष, आघाड्यांचे नेते स्वतंत्रपणे बैठका घेऊन आपली ताकद अजमावत आहेत. शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता प्रभागरचना महत्त्वाची ठरणार आहे. सध्या गावभाग, गोंदिलवाडी, कृषीनगर, पलूस कॉलनी, विद्यानगर, शिवदत्त कॉलनी, शिवाजीनगरमध्ये कार्यकर्त्यांना जमवून रात्री उशिरापर्यंत राजकीय खलबते सुरू असतात.